Saturday, December 21, 2024
Homeराज्यहिंगोली ते लिंबाळा बससेवा सुरू करण्यासाठी आडगाव फाटा येथे दीड तास रास्ता...

हिंगोली ते लिंबाळा बससेवा सुरू करण्यासाठी आडगाव फाटा येथे दीड तास रास्ता रोको…

हिंगोली – गोपाल सातपुते

सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली ते लिंबाळा बस सेवा तात्काळ चालू करण्यासाठी दिनांक 14 ऑक्टोबर रोजी आडगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यामुळे तब्बल अर्धा तास मुख्य वाहतूक बंद होती.

हिंगोली ते लिंबाळा अंतर 40 किलोमीटर असून या मार्गावर लिंबाळा भिंगी आडगाव अंबाळा वडद चिंचाळा या ग्रामीण भागातून शासकीय कामासाठी व व्यक्ती कामासाठी व शालेय शिक्षणासाठी मोठ्या संख्येने नागरिक यजा करतात मात्र येण्या-जाण्यासाठी बससेवा नसल्यामुळे नागरिकांची हेळसांड होत असल्यामुळे हि बस सेवा तात्काळ सुरू करा अन्यथा ही यापेक्षाही तीव्र रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण आडगावकर यांनी दिला आहे पाहूया काय म्हणाले ते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: