Sunday, December 22, 2024
Homeराज्यशेतकरी बांधवांच्या शंकानिरसनासाठी, कृषी विभागाचा टोल फ्री कक्ष...

शेतकरी बांधवांच्या शंकानिरसनासाठी, कृषी विभागाचा टोल फ्री कक्ष…

अकोला – संतोषकुमार गवई

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या शेतीशी निगडित शंका व प्रश्नांचे समर्पक निरसन व मार्गदर्शन करण्यासाठी टोल फ्री कक्ष कार्यालयीन कामाच्या दिवशी सुरू आहे.
टोल फ्री कक्षामध्ये संपर्कासाठी 1800 233 4000 हा लॅन्डलाईन व 9822446655 हा मोबाईल व्हाट्सअप क्रमांक शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला आहे. खालीलप्रमाणे शंकांचे निरसन करण्यासाठी शेतकरी बांधव कृषी विभागाशी संपर्क करू शकतात.

टोल फ्री क्रमांक 1800 233 4000

• संपूर्ण वर्षभर सुरू आहे.
• खते बियाणे कीटकनाशके यांची खरीप रब्बी हंगामातील किंमत उपलब्धता गुणवत्ता बाबत शंका निरसन करण्यासाठी .
• कृषी विभागाचे निगडित मृदा संधारण विस्तार सांख्यिकी प्रक्रिया व नियोजन, फलोत्पादन, निविष्ठा व गुणनियंत्रण, कृषी यंत्रीकिकरण इत्यादी संबंधित शंकांचे निरसन करण्यासाठी.
संबंधित जिल्ह्यांचे कृषी विभागाचे संपर्क क्रमांक कृषी विद्यापीठांचे संपर्क क्रमांक आवश्यकता असल्यास दिले जातात

टोल फ्री क्रमांक 9822446655

• केवळ संदेश पाठवण्यासाठी.
• खरीप हंगाम व रब्बी हंगामात कृषी निविष्ठाची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकिंगबाबतच्या तक्रारी नोंदवताना शेतकऱ्यांनी आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, अडचणी किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशील व्हाट्सअप वर पाठवणेसाठी उपलब्ध आहे.

सदर टोल फ्री क्रमांक कार्यालयीन कामाच्या दिवशी सकाळी ८:०० ते संध्याकाळी ८:०० वाजेपर्यंत सुरु राहील.शेतकरी बांधवांनी सदर टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून व मार्गदर्शन घेवून आपल्या शंकांचे निरसन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Santoshkumar Gawai
Santoshkumar Gawaihttp://mahavoicenews.com
मी संतोषकुमार गवई पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या ३२वर्षापासून कार्यरत आहे.सकारात्मक विचार मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतो म्हणून no negative only & only positive news यावरच माझा विश्वास आहे.संपुर्ण देशात सर्वप्रथम कारगील युध्दाचा 'आँखो देखा हाल'मांडता आला. शोध पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या घटना घडामोडी 'महाव्हाईस 'डिजिटल माध्यमातून समाजासमोर मांडणे हे माझ ध्येय आहे... संतोषकुमार गवई अकोला- 9689142973/9860699890
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: