राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. तर येणार्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना मुस्लीम मतांचा फायदा होण्यासाठी चक्क वफ्फ बोर्डाच्या बाजूने भूमिका घेतना ते दिसत आहे. राजकारणाने उद्धव ठाकरे यांना इतके पछाडले आहे की, त्यांनी आता वक्फ बोर्डाच्या जमिनींचेही समर्थन करण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे आणि वक्फ बोर्डाचा काय संबंध? वक्फ बोर्डाच्या कायद्यातील सुधारणांना मुस्लीम समाजाचा विरोध असेल, तर त्याबाबत कायदेशीर संघर्ष वक्फ बोर्ड करील. उद्धव ठाकरे यांनी या जमिनींचे समर्थन करण्याची काय गरज? तसेच इतक्या प्रचंड जमिनींचा वापर समाजोपयोगी कार्यासाठी केला जात आहे का, हाच खरा प्रश्न. येथील नागरिकांना पडला आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेचा येथील काही नागरिक विरोध करताना पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जवळ येत चालल्या असून, त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांमधील अस्वस्थता वाढत चाललेली दिसते. लोकसभेत भाजप आणि शिवसेनेला अनपेक्षित फटका बसला असला आणि काँग्रेस व उबाठा सेनेच्या उमेदवारांनी यश संपादन केले असले, तरी विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता दिसत नसल्याने ही अस्वस्थता निर्माण होत आहे. त्यामुळे ज्या अल्पसंख्य मतदारांच्या भरवशावर उबाठा सेना अवलंबून आहे, त्यांना गोंजारण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरे यांनी आता वक्फ बोर्डाच्या विधेयकाला विरोध सुरू केला असून, या जमिनींचे समर्थनही सुरू केले आहे.
महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांचा एक संयुक्त मेळावा नुकताच मुंबईत पार पडला. त्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा या आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, आपण त्या व्यक्तीला पाठिंबा देऊ, असे जाहीर केले. पण, हे वक्तव्य म्हणजे, त्यांनी दिल्लीत जाऊन स्वत:ला मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्यासाठी केलेला उतावीळपणा लपविण्याचा तो प्रयत्न होता. या मुद्द्याला थंड प्रतिसाद लाभल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा मुस्लीम मतपेढीला गोंजारण्याचे प्रयत्न सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणजे, त्यांनी आपल्या भाषणात वक्फ बोर्डाकडील जमिनींचे केलेले समर्थन!