Tuesday, December 24, 2024
HomeMarathi News TodayTJMM teaser | अखेर रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या चित्रपटाचे शीर्षक जाहीर...असा...

TJMM teaser | अखेर रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या चित्रपटाचे शीर्षक जाहीर…असा आहे ट्रेझर…

न्युज डेस्क – रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या आगामी ‘टीजेएमएम’ या चित्रपटाचे शीर्षक अखेर जाहीर झाले आहे. हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल, पण लव रंजनच्या चित्रपटाचे नाव आहे ‘तू झुठी मैं मक्कर’ यासोबतच चित्रपटाचा टीझरही रिलीज करण्यात आला आहे, ज्यामध्ये रणबीर आणि श्रद्धाची व्यक्तिरेखा खूपच मनोरंजक दिसत आहेत.

तू झुठी मैं मक्कर: ‘प्यार का पंचनामा’ सारखे हिट चित्रपट देणारे दिग्दर्शक लव रंजन यावेळी ‘तू झुठी मैं मक्कर’ घेऊन येत आहेत. यात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या भूमिका आहेत. एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करणारे दोन्ही स्टार चित्रपटाच्या शीर्षकाप्रमाणेच खोट्या नात्यात असल्याचे टीझरमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

आता या चित्रपटाची कथा काय आहे, याबद्दल ट्रेलर आल्यावरच अधिक माहिती मिळेल. आत्तापर्यंत, हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट पुढच्या वर्षी होळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. 8 मार्च 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: