गणेश तळेकर
नियम व अटी
स्पर्धा १६ वर्षापुढील वयोगटासाठी असून सर्वांसाठी (मुले/मुली) खुली आहे.प्रवेश विनामूल्य असून कोणत्याही प्रकारचे शुल्क स्पर्धकाकडून घेतले जाणार नाही.प्राथमिक फेरी ही ऑनलाईन पद्धतीने होईल. त्यासाठी स्पर्धकांनी लावणी गीतावर नृत्य सादर करून आपली व्हिडीओ फित पाठवावी.
व्हिडीओ सुरू करण्याअगोदर स्पर्धकांनी आपले नाव, शहर, आणि मोबाईल नंबर सांगून त्यानंतर आपले नृत्य सुरू करावे. अंतिम फेरीमध्ये स्पर्धकाने फक्त पारंपारिक किवा चित्रपटातील लावणीगीतावर नृत्य सादर करावयाचे आहे.नृत्य सादरीकरणाचा कालावधी जास्तीत जास्त ४ मिनिटे आहे.
अंतिम फेरीत स्पर्धकांनी आपले गाणे पेनड्राइव्ह किंवा मोबाईलमध्ये स्वतः घेऊन येणे आणि स्पर्धा सुरू होण्याअगोदर आपले गाणे चेक करून घेणे.स्पर्धा एकेरी स्वरूपातील असून समूह नृत्याचा (कोरस) उपयोग करू नये. तसेच कोणत्याही प्रकारचे आयटम साँग किंवा अश्लील चाळे चालणार नाहीत.
गाण्याचा प्रकार सिंगल असावा मेडली नसावी.स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व कलाकारांसाठी खुली आहे.प्राथमिक फेरीला वेशभूषेची आवश्यकता नाही, अंतिम फेरीला वेशभूषा आवश्यक आहे.अंतिम फेरीसाठी २५ स्पर्धक निवडले जातील आणि त्यातूनच पारितोषिक विजेते काढले जातील.
★ प्रथम क्रमांक
रोख रु. ५५५५/- सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
★ द्वितीय क्रमांक
रोख रु. ३३३३/- सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
★ तृतीय क्रमांक
रोख रु.२२२२/- सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
★ दोन उत्तेजनार्थ
प्रत्येकी रोख रु.११११/- सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
★ २० सहभागी स्पर्धकांस सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
◆ स्पर्धकांनी वयाचा पुरावा सोबत घेऊन येणे बंधनकारक आहे.
◆व्हिडियो पाठवण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२३
◆ अंतिम फेरी ची तारीख आणि वेळ आपणास कळविण्यात येईल.
◆ अंतिम फेरी टिटवाळा , ता.कल्याण, जि.ठाणे येथे संपन्न होईल.
◆ परीक्षकांचा निर्णय अंतिम आणि स्पर्धकांना बंधनकारक राहील.
◆ स्पर्धकांनी खालील क्रमांकावर आपल्या नृत्याचा व्हिडीओ पाठवणे.
स्नेहल – 9664152268
सारिका – 7718944627
उज्वला – 8425964499
प्रिती – 7718075851