Monday, December 9, 2024
Homeगुन्हेगारीतिरोडा टिप्परची दोन दुचाकींना जब्बर धडक; एक ठार, दोन जखमी...

तिरोडा टिप्परची दोन दुचाकींना जब्बर धडक; एक ठार, दोन जखमी…

गोंदिया – महेंद्र कनोजे

तिरोडा : अदानी विद्युत प्रकल्पाचे राखेची विल्हेवाट लावण्यासाठी राख घेवून जात असलेल्या टिप्परने दोन दुचाकींना मागून जब्बर धडक दिली. दरम्यान दुचाकीस्वार एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दोन्ही दुचाकीचे चालक किरकोळ जखमी झाले. ही घटना आज सकाळी ११ वाजता सुमारास चुरडी नाक्याजवळ घडली. प्रमिला प्रमोद थुलकर (४५) रा.ठाणेगाव असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे.

चुरडी फाट्याजवळील घटना

ठाणेगाव येथील प्रमिला प्रमोद थुलकर (४५) ही महिला नातेवाईकासोबत दुचाकीने ठाणेगावकडून तिरोडाकडे जात होती. त्याचप्रमाणे त्याच मार्गावर वर्धा येथील उमेश विनोद राठोड (१९) हा युवक दुचाकीने भंडाराकडे जात होता. चुरडी नाक्याजवळ अदानी विद्युत प्रकल्पातून राख भरून जात असलेल्या टिप्परच्या चालकाने लापरवाहीने चालवून दोन्ही मोटारसायकलला मागून धडक दिली. या अपघातात प्रमिला थुलकर या महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दोन्ही दुचाकीचे चालक थोडक्यात बचावले असले तरी किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेची नोंद तिरोडा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे”.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: