Saturday, September 21, 2024
Homeराज्यशेतात जिवंत विद्युत प्रवाह लावुन जंगली वन्यप्राणी डुक्कराची शिकार करणाऱ्या आरोपीला तिरोडा...

शेतात जिवंत विद्युत प्रवाह लावुन जंगली वन्यप्राणी डुक्कराची शिकार करणाऱ्या आरोपीला तिरोडा वन विभागाने केले ताब्यात…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

गोंदिया दिनांक 03/11/2023 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प लगत असलेल्या चोरखमारा (मारेगाव) शेती परिसरात आरोपी योगराज उदेलाल रहांगडाले वय 50 वर्ष राहणार भजेपार यांनी वन्यप्राण्यांचे शिकार करण्याच्या हेतूने जिवंत विद्युत प्रवाह सोडून जंगली डुकराची शिकार केल्यावरून मोक्यावर जाऊन शिकार झालेले मृत रान डुक्कर, विद्युत प्रवाह सोडण्यासाठी वापरलेले तार जप्त केले तसेच आरोपी योगराज रहांगडाले यांना अटक केली.

आरोपीने सदरचा गुन्हा कबूल केलेला आहे.ही कार्यवाही दिलीप कौशिक वनपरिक्षेत्र अधिकारी विशेष व्याघ्र संरक्षण दल यांचे मार्गदर्शनात वनरक्षक सुनील भालेराव , आशिष रामटेके , शिवराज पिसाळ , प्रणय वालदे, धनंजय कोकाटे , सागर भेलावे , महेश रहांगडाले , ड्रायव्हर नितीन पटले यांनी करून सखोल चौकशीसाठी वनपरिक्षेत्र तिरोडा (प्रा.) यांचे स्वाधीन करण्यात आले पुढील कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी योगेंद्र सिंह IFS (परिविक्षाधीन) , वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक व कर्मचारी करीत आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: