मुख्यमंत्री शिंदे साहेब मला गांजा विक्रीची परवानगी द्या…राजू दासरवार
किनवट: शहरातील सर्वात जुना रहिवासी भाग असणार रामनगर हे एकेकाळी शहरातील संस्कृतीक वस्ती म्हणून ओळखलं जायचं पण, आज अवैध दारुविक्री आणि अवैध धंद्यासाठी ओळखल जात आहे. या अवैध दारुविक्रीमुळे येथील रहिवासी त्रासले असून दारुड्यानी हैदोस मांडला आहे. या अवैध दारुविक्रीमुळे खून, हाणामारी,घरगुती हिंसाचार असे अनेक गुन्हे घडत आहेत.
या समस्याकडे अनेक वेळा स्थानिक प्रशासनाला सूचना देऊनही प्रशासनाकडून हवी तशी कारवाई होत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असल्याच भीषण वास्तव रामनगरमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे जर या अवैध दारूविक्रीवर कारवाई होणार नसेल तर ‘मला गांजा विकण्याची परवानगी द्या’ असा ईमेल रामनगर येथील रहिवासी राजू दासरवार यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. यानंतर प्रशासनाकडून कारवाई तर झाली परंतु त्यानंतर अधिक जोमाने दारुविक्री चालत असल्याच चित्र पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्र्यांना मेल केल्यानंतर जी प्रशासनाकडून कारवाई झाली त्यात पोलिसांनी 3 ठिकाणी कारवाई केली व या कारवाईत पोलिसांना जवळपास दहा हजारांची विना परवाना अवैध दारू आढळली त्यावर पोलिसांनी 3 जणांविरोधात गु. र. नं. 289/2024 कलम 65(ई) म. दा. का. प्रमाणे गुन्ह्यांची नोंद केली. परंतु अजूनही ही अवैध दारुविक्री अजूनही चालूच आहे.
त्यामुळे जर प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यानंतर राष्ट्रपती द्रौपति मुर्मू यांच्याकडे व तरीही कारवाई न झाल्यास येत्या निवडणुकांवर समस्त रामनगरवासी बहिष्कार टाकणार असा पवित्रा राजू दासरवार यांनी घेतला आहे.