Sunday, December 22, 2024
Homeराज्यप्रवासी वाहनाचे टायर फुटून अपघात, दोन गंभीर अवस्थेत तर सहा जण जखमी...

प्रवासी वाहनाचे टायर फुटून अपघात, दोन गंभीर अवस्थेत तर सहा जण जखमी…

पातूर – निशांत गवई

शहर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या शिर्ला फाटा येथे एका भरधाव वेगात असलेल्या प्रवासी वाहनाचा अपघात झाला असून दोन जण गंभीर असून सहा जखमी झाल्याची घटना घडली आहे.
आज दि.13 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10:00 वाजताच्या सुमारास पातूर पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या शिर्ला फाट्यावर भरधाव वेगात जात असलेल्या एका प्रवासी वाहनाचे अचानकपणे टायर फुटल्याने एम.एच. 25 आर 8240 क्रमांकाची महिंद्रा सुप्रो गाडीने दोन पलट्या झाल्याने जोरदार अपघात झाला असून या अपघातामध्ये गाडीतील प्रवासी असलेल्या जयवंतीबाई जाधव (वय 27) व योगीता राठोड (वय 18) हे गंभीर जखमी असून सहप्रवासी असलेले ,गीताबाई राठोड, कस्तुराबाई राठोड,शशिकला चव्हाण,लिलाबाई राठोड,सखूबाई चव्हाण सर्व राहणार बोडखा, ता.पातूर हे जखमी झाले आहेत.

दरम्यान स्थानिकांच्या मदतीने सर्व जखमींना दूल्हे खान युसूफ खान, बोडखा येथील सरपंच विकास वानखडे,नितेश वानखडे,इंदल चव्हाण, इंदल चव्हाण, अमोल राठोड, अमोल राठोड, पंकज राठोड, सैय्यद मुमताज,संतोष चव्हाण,गोपाल चव्हाण, शंकर राठोड, प्रेमसिंह राठोड, विकास अत्तरकर यांनी जखमींना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे हलविण्यासाठी केली. यावेळी 108 रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने आरोग्य विभागाचा बेतालपणा चव्हाट्यावर आला.दरम्यान रघुनाथ यांनी आपल्या खाजगी आर्टिगा कारमध्ये जखमींना मारुति ओमनी लग्जरी बस रुग्णालयात नेऊन माणुसकीचा परिचय दिला.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: