आजकाल सोशल मिडियावर मैत्रीतून अनेक गुन्हे घडत आहेत, अश्याच एका प्रकरणात केरळ पोलिसांनी शनिवारी एका सोशल मीडिया कलाकाराला अटक केली. त्याच्यावर महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले, त्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही घटना महिनाभरापूर्वी घडल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींनी विद्यार्थिनीला ठामपनूर परिसरातील एका लॉजमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला असल्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश आर यांनी सांगितले, आरोपींनी महाविद्यालयीन विद्यार्थ्याची सोशल नेटवर्किंग साइटवर भेट झाली होती, त्यानंतर दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महाविद्यालयीन विद्यार्थिनीला एका सोशल नेटवर्किंग साइटवर भेटला होता. यानंतर दोघांची मैत्री झाली आणि दोघे रिलेशनशिपमध्ये आले. पीडितेने पोलिसांना सांगितले की, आरोपीने तिला फोन करून कार घेण्याच्या बहाण्याने सोबत येण्यास सांगितले. मुलीने ते मान्य केले. वाटेत दोघेही विश्रांती घेण्यासाठी लॉजवर गेले, तेथे आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर दोघेही एकत्र कारने खरेदी करण्यासाठी निघून गेले.
लॉजवर घडलेल्या प्रकारामुळे व्यथित झालेल्या विद्यार्थिनीने आरोपीच्या मित्रांकडे तिची चौकशी केली. यानंतर आरोपीचे अनेक महिलांशी संबंध असून तो विश्वासार्ह व्यक्ती नसल्याचे समोर आले. यानंतर तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांना फोनमध्ये अनेक व्हिडिओ मिळाले
तपासादरम्यान पोलिसांना आरोपीच्या फोनमध्ये अनेक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले. आता या व्हिडिओंचा वापर इतर महिलांना ब्लॅकमेल करण्यासाठी केला जात आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल सायबर सेलकडे पाठवला आहे.
प्रसिद्ध होण्यासाठी टिप्स द्यायचा
पोलिसांनी सांगितले की, आरोपीचे शॉर्ट-व्हिडिओ होस्टिंग प्लॅटफॉर्मवर लाखो फॉलोअर्स आहेत. आरोपी विवाहित महिलांना टार्गेट करत असे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याच्या टिप्स देण्याच्या बहाण्याने तो जवळीक वाढवत असे. यानंतर त्यांचे अनेक वैयक्तिक फोटो त्यांच्या फोनमध्ये सेव्ह होत असत. त्यानंतर तो त्यांना आपली शिकार बनवत असे.