Sunday, December 22, 2024
HomeSocial TrendingTiger-3 | सलमान खानच्या चाहत्यांनी जीव धोक्यात घालून चित्रपटगृहात केली आतिषबाजी...Viral Video

Tiger-3 | सलमान खानच्या चाहत्यांनी जीव धोक्यात घालून चित्रपटगृहात केली आतिषबाजी…Viral Video

Tiger-3 : काल 12 नोव्हेंबरला सलमान खानचा ‘टायगर-3’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे त्याचे चाहते खूप उत्साहित झाले आहेत. मालेगावमध्ये जेव्हा सलमानचा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा चाहत्यांना खूप उत्सुकता होती. यादरम्यान शेकडो चाहत्यांनी सिनेमागृहातच फटाके फोडण्यास सुरुवात केली. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये इतर चाहतेही थिएटरमध्ये स्वताच्या सुरक्षिततेसाठी धावताना दिसत आहेत. हा व्हिडिओ नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील मोहन सिनेमातील आहे.

सलमान खानचा ‘टायगर 3’ 12 नोव्हेंबरला अनेक भाषांमध्ये रिलीज झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 44 कोटींहून अधिक कमाई केली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात मालेगावमधील थिएटरमध्ये चाहते फटाके फोडताना दिसत आहेत. वृत्तानुसार, हा व्हिडिओ नाशिकच्या मालेगाव येथील मोहन सिनेमागृहात काढण्यात आला आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सलमान जेव्हा पडद्यावर येताच लोकांनी फटाक्यांची आतषबाजी सुरू केली. थिएटरमध्ये बसलेले अनेक चाहते सुरक्षिततेकडे धावताना दिसतात. केवळ मालेगावातच नाही तर देशभरातील अनेक चित्रपटगृहांमध्ये सलमान खानच्या चाहत्यांनी रॉकेट आणि फटाके फोडले.

दिग्दर्शक मनीष शर्माचा ‘टायगर 3’ हा एक एक्शन थ्रिलर आहे, ज्यामध्ये सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यामध्ये इमरान हाश्मी खलनायक ठरला आहे. हा चित्रपट 2017 मध्ये आलेल्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचा सिक्वेल आणि YRF स्पाय युनिव्हर्सचा पाचवा भाग आहे. चित्रपटाची पटकथा श्रीधर राघवन यांनी लिहिली असून संवाद अंकुर चौधरी यांनी लिहिले आहेत. कथा आदित्य चोप्राने लिहिली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: