Tuesday, December 24, 2024
Homeराज्यमेघगर्जना, जोराचा पाऊस आणि थेट ट्रॅक्टर शिरली नाल्यात…

मेघगर्जना, जोराचा पाऊस आणि थेट ट्रॅक्टर शिरली नाल्यात…

रामटेक – राजु कापसे

नागपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट मिळाल्यानंतर सकाळपासूनच मेघगर्जनेसह अति जोराच्या पावसाने हजेरी लावत ग्रामीण भागातील शेतकरी, नागरिकांना रडण्यास भाग पाडले असुन सकाळपासूनच सुरू झालेल्या पावसाने अनेकांचे जीवन विस्कळीत केले आहे.

परिसरातील बोरडा (सराखा) येथे शेतात समीर रतन डडमल यांनी सुखदेव भरडे यांच्या शेतात स्वतःच्या मालकीची ट्रॅक्टर चिखलनी करण्याकरिता घेऊन गेले होते.सकाळपासूनच मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस सुरू असताना शेतात काम करणे शक्य नसल्याने त्यांनी घराची वाट धरली.

मात्र घराकडे येत असतांना अचानक जोराची वीज कडाडली व अचानक वीज चमकल्याने ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण ट्रॅक्टरवरून नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उजव्या बाजूला असलेल्या नाल्यात शिरली.मात्र सुदैवाने ट्रॅक्टर चालकासहित अन्य शेतकरी सुखरूप बचावले आहेत.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: