रामटेक – राजू कापसे
कविकुलगुरु इंस्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी अॅण्ड सायंस रामटेक येथील 400 विद्यार्थिनी, पालक व प्राध्यापक यांनी 25 जुलाई 2024 ला सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत बेबिनारच्या माध्यमातून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी संवाद साधला.
मा.चंद्रकांतदादा पाटील वेबिनारच्या माध्यमातून म्हणाले की शैक्षणिक वर्ष 2024 – 25 पासुन तंत्रशिक्षण सहित 642 अभ्यासक्रम करिता उच्च व तंत्रशिक्षण विभागाद्वारे विद्यार्थी हिताच्या दृष्टीने अनेक योजना राबविण्यात येतात. या वर्षी पासून 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थिनी करीता 50 टक्के लाभाऐवजी 100 टक्के लाभ देण्यात मेईल. यात शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्काच्या समावेश असेल. या विषयी त्यांनी सवीस्तर माहिती दिली.
वेबिनार करीता किट्सच्या सिल्वर जुबली सेमिनार हॉल मध्ये मोठया पडदयावर चंद्रकांतदादा पाटिल यांचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. प्राचार्य डॉ अविनाश श्रीखंडे यांनी महाराष्ट्र सरकारच्या 100 टक्के लाभ देण्याच्या योजनेचे स्वागत केले व सरकारला धन्यवाद दिले. विद्यार्थ्यांना संबोधन करतांना म्हणाले की सर्व विद्यार्थिनीनी योजनेच्या लाभ घ्यावा, योजनेच्या लाभा करिता त्यांनी नोडल अधिकारी डॉ. महेश मावले यांच्या नावाची घोषणा केली.