Sunday, December 22, 2024
Homeकृषीबी सी आय प्रकल्पा मार्फत शेतकरी अनुभव देवाण घेवाण मेळावा संपन्न...

बी सी आय प्रकल्पा मार्फत शेतकरी अनुभव देवाण घेवाण मेळावा संपन्न…

अकोला येथील शेतकरी सदन येथे बाळापुर, अकोला, मुर्तीजापुर, तेल्हारा, अकोट ,ह्या तालुक्यातील बीसीआय प्रकल्पातील प्रयोगशील शेतकऱ्यांचा शेतकरी मेळावा संपन्न झाला. यामध्ये बी. सी. आय प्रकल्प, कॉटन कनेक्ट तसेच कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर मार्फद क्षेत्र प्रवर्तक यांनी प्रशिक्षणामध्ये सांगितलेल्या कपाशी पिकांमधील गतिविधि किती प्रमाणात स्वीकारल्या याविषयी शेतकऱ्यांचे पॅनल बसून त्यांच्याकडून माहितीची देवाण-घेवाण करण्यात आली. यामध्ये शेतकऱ्याकडूनच खालील गतीविधीचा अवलंब केल्यामुळे त्यांना काय काय फायदे झाले हे समजले.

१)जैविक कीटकनाशकांचा जास्तीत जास्त वापर केला त्यामुळे रासायनिक कीटकनाशकावरील खर्च वाचला जसे,(जीवामृत,दशपर्णी,निंबोळी अर्क इत्यादी)
२)फवारणी करतेवेळी सुरक्षा साधनांचा जास्तीत जास्त परिपूर्ण वापर यामुळे कुठल्याही रासायनिक कीटकनाशकाची शरीरावर विषबाधा झाली नाही.
३)माती परीक्षण करून खताची मात्रा देण्यात खूप फायदा आहे त्यामुळे जमिनीचा पोत चांगला राहतो शिवाय पिकाला जेवढे पाहिजे तेवढेच रासायनिक खत दिले जातात.
४)जैवविविधता साठी पिकाची फेरपालट, झाडे लावणे, पक्षी थांबे,ट्रॅप क्रॉप, फेरोमन ट्रॅप,तसेच किटनाशकाचे रिकामे डब्बे जमिनीत न गाळणे, न जाळणे, पाण्यात न धुणे ह्या गोष्टीचा अवलंब केला.
५)आंतर पीकाची लागवड यामुळे नगदी पीकही मिळाले शिवाय नत्रयुक्त खताचे प्रमाणही कमी द्यावे लागले व मल्चिंगचा वापर म्हणूनही उपयोग केला
६)सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी पिकांची फेरपालट व जैविक घटकांचा वापर केला यामध्ये (गांडूळ खत,कम्पोस्ट खत इस्त्यादी) तसेच कापूस पीक काढणी झाल्यावर ते शेतात न पेटवता श्रेडर ने कापणी केल्यामुळे जमिनीचा कर्ब वाढण्यास मदत झाली असे स्व अनुभवातून शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात सांगितले शिवाय शेतकऱ्यांना विविध डेमो प्लॉटच्या माध्यमातून माहिती सुद्धा देण्यात आली.

ह्या कार्यक्रमाच्या वेळी कॉटन कनेक्ट चे श्री.हेमंत ठाकरे सर यांनी महिला शेतकरी, व शेतकरी यांच्याशी संवाद साधला शिवाय ह्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेचे सीईओ श्री.अमित नाफडे सर यांनी सुद्धा शेतकऱ्यांसोबत संवाद साधला, तसेच टेक्निकल मार्गदर्शक म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी प्राध्यापक डी.पी.चौधरी सर तसेच श्री. एकनाथजी मापारी सर कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेचे मॅनेजर यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले व तसेच तिन्ही प्रोडूसर युनिटचे मॅनेजर अक्षय असोलकर, अश्विनी गजबिये,पूजा शिंदे तसेच सर्व क्षेत्र प्रवर्तक व भरपूर महिला शेतकरी हजर होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: