महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी पुण्यातून एक मोठे प्रकरण समोर आले आहे. येथे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वनराज आंदेकर असे माजी नगरसेवकाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वनराजवर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. इतकंच नाहीतर आरोपींनी गोळ्या घालून झाल्यावर कोयत्यानेही त्यांच्या सपासप वार केले. या हल्ल्यात राष्ट्रवादीच्या नेत्याचा मृत्यू झाला. वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या 3 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या त्यांची कसून चौकशी सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील नाना पेठ परिसरात रविवारी रात्री ही घटना घडली. हल्लेखोराने पिस्तुलातून एकामागून एक अनेक गोळ्या झाडल्या. यानंतर जखमी हल्लेखोराला रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर हल्ला झाला तेव्हा ते नाना पेठेतील डोके तालीम भागात राहत होते. वनराजच्या हत्येपूर्वी परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, वनराज आंदेकर यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. वनराज आंदेकर यांचा खून कौटुंबिक वाद आणि पैशांवरु झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तीन जणांची कसून चौकशी सुरु आहे. पुण्यातील नाना पेठ परिसरात वनराज आंदेकर यांच्यावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांच्यावर वारही करण्यात आले. आता वनराज यांच्यावर पूर्ववैमनस्यातून गोळीबार करण्यात आला असून हा गोळीबार निकटवर्तीयांकडूनच झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वनराज आंदेकर यांच्या हल्ला करणाऱ्या संशयित आरोपींची नावे समोर आली आहेत. गणेश कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड आणि तुषार आबा कदम अशी या तिघांची नावे आहेत. गणेश कोमकर हा कुख्यात गुंड बंडू उर्फ सुर्यकांत आंदेकर याचा जावई असल्याची माहिती समोर येत आहे.
अस घडल हत्याकांड…
वनराज आंदेकर कार्यजवळ एकटेच उभे होते, त्यावेळी डोके तालीम चौकातील लाईट घालवण्यात आली. अंधाराचा आणि आंदेकर एकटे असल्याचा फायदा घेत आरोपी दुचाकीवर आले आणि पाच राऊंड फायर केले. गोळीबार झाल्यावर परिसरात मोठी खळबळ उडाली. आरोपींनी वनराज आंबेकर यांच्यावर गोळीबार केल्यावर कोयत्यानेही वार केले. काही क्षणात आंदेकर रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. वनराज आंदेकर यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या हत्येमागचे नेमके कारण काय आणि यामध्ये आणखी आरोपी आहेत का हे आता पोलीस तपासामध्ये समोर येईल.