Friday, November 22, 2024
Homeशिक्षणकिड्स पॅराडाईजच्या तीन विद्यार्थ्यांची कुस्ती स्पर्धेत बाजी...

किड्स पॅराडाईजच्या तीन विद्यार्थ्यांची कुस्ती स्पर्धेत बाजी…

पातूर – निशांत गवई

जिल्हा क्रिडा कार्यलयातर्गत पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी बाजी मारली. कुस्ती स्पर्धेत सय्यद शाहिद आणि सिद्धांत पेंढारकर व ओम बंड या तीन विद्यार्थ्यांनी बाजी मारून जिल्हास्तरावर यांची निवड झाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणारी शालेय कुस्ती स्पर्धा सन 2023-24 अंतर्गत प्रभात किड्स स्कूल मध्ये घेण्यात आली. या कुस्ती स्पर्धेमध्ये किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल मधील इयत्ता नववीत शिकणारा विद्यार्थी सैय्यद शाहिद कुस्ती (फ्री स्टाईल) 17 वर्षीय वयोगटातील 65 किलो वजन गटामध्ये प्रथम आला आहे.

तसेच इयत्ता आठवी शिकणारा सिद्धांत पेंढारकर कुस्ती ( ग्रीको रोमन ) 17 वर्षीय वयोगटात प्रथम आला तर दहावीत शिकणारा ओम बंड याने 17 वर्षे वयोगटातील द्वितीय येऊन जिल्हास्तरावर या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे, कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे यांनी तिन्ही विद्यार्थ्याचा सत्कार केला. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय क्रिडा शिक्षक अविनाश पाटील, विठ्ठल लोथे सर, आई, वडील यांना दिले आहे.आला आहे. दोघांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे, कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे यांनी दोन्ही विद्यार्थ्याचा सत्कार केला. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय क्रिडा शिक्षक अविनाश पाटील, विठ्ठल लोथे सर, आई, वडील यांना दिले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: