अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील कोथळी येथे गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचा कला व क्रीडा गुणचा विकास व्हावा या उदात्त हेतून १० अक्टोबर ते १२ अक्टोबर पर्यत असे तीन दिवसीय प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
या क्रीडा स्पर्धाचे उदघाटन प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले असून या स्पर्धेत अकोला ,बुलढाणा,व वाशिम या तिन्ही जिल्ह्यातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील एकूण ६५० खेळाडू मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.या खेळात संघीक व वयक्तिक क्रीडा मध्ये १०० मीटर धावणे,थाळी फेक,गोळा फेक,रिले, कबड्डी, खोखो,हॉली बॉल, हँड बॉल,इत्यादी खेळ खेळले.
तर कार्यक्रमाचे उदघाटन प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे यांच्या हस्ते मशाल पेटवून कार्यक्रमाल सुरवात करण्यात आले. कार्यक्रमाल प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी समाजसेवक पुरस्काराने सन्मानित असलेले लक्ष्मण सळके,जिल्हा परिषद सदस्य गणेश झळके, सरपंच दीपक झळके,विशेष उपस्थित नाईक,सहाय्यक प्रकल्प अधिकारी धनाडे, राजेश पन्हाडे, वंदे, टेकाम,मुख्याध्यापक यशवंत इंगोले,शिक्षक गोतमारे,राऊत, शिंदे,केदार ,पवार, आदी शिक्षक उपस्थित होते.
प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोथळी,सदर स्पर्धेचे उदघाटन सोहळ्याचे संचालन अमोल पारवे,तर आभार प्रमोद इंगळे यांनी मानले आहे. कोविड १९ मूळे स्पर्धा थांबल्या होत्या.परंतु या वर्षी प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धा होत असल्याने याचा आनंद होत आहे.विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक जीवनात खेळाचे अनन्य साधारण महत्व आहे.
अमोल पारवे, अध्यक
शासनमान्य आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना अकोला