उद्योजकता विकास परिषदेची तारीख लवकरच…
महापरिवर्तनम फाउंडेशन, स्वयं सिद्ध उद्योजकता विकास अभियान, यांचे संयुक्त उपक्रम.
अमरावती – दि 2 देशात नव्याने उद्योजक घडावे, त्यांना मार्गदर्शन मिळावे आणि त्यांना प्रेरणा, मार्गदर्शन मिळावे यासाठी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे आंतराष्ट्रीय स्तराचे वक्ते सोनू शर्मा यांचा तिनतासाचा शो आणि तिन दिवशीय बिजनेस एक्सो. दि.१९ मार्चला दुपारी 12 वाजताचा शो कार्यक्रम पुढे ढकलला असुन लवकरच नविन ताऱीख कळविण्यात येणार आहे.
अशी माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. महापरिवर्तनम ही संस्था दोन वर्षापासून औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून ग्रामिण, आदिवासी, मागास प्रवर्गातील नवउद्योजकांना, त्यांचे प्रस्ताव करणे, त्यांना कर्ज उपलब्ध करून देऊन आणि विविध संस्थाच्या माध्यमातून प्रशिक्षण देते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सिईओ चंद्रकांत इंगळे हे तरुण, कल्पक उद्योजक आहेत.
भारतातील नव उद्योजकांना “उद्योजक घडेवू, उद्योजक बनवू” या उद्देशाने तरुण उद्योजक म्हणून पुढे यावासाठी आंतरराष्ट्रिय स्पिकर सोनू शर्मा यांना अमरावती विभागात आणले आहे.
आंतरराष्ट्रीय स्पिकर सोनू शर्मा हे यांचे हस्ते ‘ बिजनेस एक्सो’ चे उद्घाटन करणार होते.काही अपरिहार्य कारणामुळे दि 19मार्च 23चा कार्यक्रम पुढे ढकलला,नविन तारिख वेळ ठरविण्यात येणार असल्याचे कार्यक्रमाचे संयोजक किरणभाऊ पातूरकर , चंद्रकांत इंगळे,यांनी कळविले