पातुर वन विभागाची कारवाई
पातुर – निशांत गवई
पातुर तालुका प्रतिनिधी पातुर वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या मलकापूर शेत शिवारामध्ये पातुर बेलतळा रस्त्यावर काही चोरटे सायकलवर सागवान कटाई करून चोरी करत असल्याची भनक लागल्यावर पातुर वन विभागाचे कर्मचारी दबा धरून बसले होते.
त्याचवेळी सायकलवर सागवान घेऊन चोरटे जात असताना त्यांना पकडण्यासाठी धावले असता सागवान चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला आणि सायकल आणि 17 सागवान चौरस सागवान ज्याची किंमत सायकल सह 29 हजार रुपये किमतीचा म** जप्त करण्यात आला असून अज्ञात आरोपीचा विरुद्ध पातुर वन विभागाने गुन्हा नोंदविला आहे.
सदरची कारवाई वनरक्षक आर के बोराळे आर एस काकडेएन ए सावळे यांनी पार पाडली पुढील तपास अकोला वन विभागाचे उपवनसंरक्षक कुमार स्वामी एस आरसहाय्यक वनसंरक्षकसुरेश वडोदे पातुर वनपरिक्षेत्र अधिकारी यस डी गव्हाणेयांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे पातुर वनपरिक्षेत्रामध्ये वन गुन्ह्यासंबंधी काहीही माहिती असल्यास वन विभागाला कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.