Monday, December 23, 2024
HomeBreaking NewsLOC वर हिमस्खलनात लष्कराचे तीन जवान शहीद…धुळे जिल्ह्यातील मनोज लक्ष्मण गायकवाड यांना...

LOC वर हिमस्खलनात लष्कराचे तीन जवान शहीद…धुळे जिल्ह्यातील मनोज लक्ष्मण गायकवाड यांना वीरमरण…

न्यूज डेस्क : उत्तर काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील दहशतवादी घुसखोरीवर लक्ष ठेवण्यासाठी गस्त घालत असताना मोठ्या हिमस्खलनात लष्कराचे तीन जवान शहीद झाले. या घटनेबद्दल माहिती देताना, संरक्षण प्रवक्ते कर्नल इम्रान मोसावी म्हणाले, “17 आणि 18 नोव्हेंबर च्या मध्यरात्री, कुपवाडा उत्तर काश्मीरमधील मछल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ हिमस्खलन झाले .”

बर्फात अडकलेल्या दोन जवानांची सुटका करून कुपवाडा येथील लष्करी रुग्णालयात नेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पीआरओ डिफेन्स श्रीनगर म्हणाले की, अथक प्रयत्न करूनही तिन्ही शूरवीर जिवंत राहू शकले नाहीत आणि कर्तव्यासाठी त्यांनी सर्वोच्च बलिदान दिले. नाईक मनोज लक्ष्मणराव गायकवाड, लान्स नाईक मुकेश कुमार आणि गनर सौविक हाजरा अशी या तीन वीरांची नावे आहेत.

शहीद नाईक मनोज लक्ष्मणराव गायकवाड हे एकेचाळीस वर्षांचे असून ते २००२ मध्ये सैन्यात दाखल झाले होते. ते धुळे जिल्ह्यातील चिंचखेडे या गावातील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे. दिवंगत लान्स नाईक मुकेश कुमार 22 वर्षांचे होते आणि 2018 मध्ये ते लष्करात दाखल झाले होते. तो गाव सजवंतगड, पोस्ट रोडू, तहसील लाडनून, जिल्हा नागौर, राजस्थानचा रहिवासी. बहादूर यांच्या पश्चात त्याची आई आहे.

दिवंगत गनर सौविक हाजरा हे बावीस वर्षांचे होते आणि २०१९ मध्ये लष्करात दाखल झाले होते. ते खमरबेरिया, पोस्ट ओंडा, तहसील बांकुरा सदर, जिल्हा बांकुरा पश्चिम बंगालचा आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: