रामटेक – राजु कापसे
आज रामटेक येथील शांती मंगल कार्यालय येथे आई वडील आणि मुल मुली यांच्या नात्यातील भावनिक, आत्मीय धागा जोडणारे नातं व आज च्या परिस्थितीतील दिवसेंदिवस होणारे गैरप्रकार, समज गैरसमज यातून एकतर्फी प्रेम, अल्पवयीन मुल, मुली यांना जडणारे व्यसन, शाररिक आकर्षण, शोसल मीडिया तून वाढत चाललेली अश्लीलता,
एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या घटना, अल्पवयीन मुल मुली यांच्या गैरवर्तन यातुन होणारे गैरप्रकार , आई वडील शिक्षक यांच्या नात्यातील व्याख्या सांगणारे व्याखान आज आयोजीत करण्यात आले होते.
या कार्यक्रमात रामटेक शहरांतील राष्ट्रिय आदर्श शिक्षण संस्था, समर्थ शिक्षण संस्था,ताई गोळवलकर महाविद्यालय, नरेंद्र तिडके महाविद्यालय, श्रीराम शिक्षण संस्था यासह अनेक शिक्षण संस्था व अनेक सामाजिक शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रमुख वक्ते वसंत हंकारे यांनी या सर्व विषयावर मार्मिक भाष्य करत आताचा किशोर वयातील विद्यार्थी यांना भावनिक व मार्मिक साद घालत उपस्थित विध्यार्थी,
पालक यांच्या काळजाला हात घातला आणि उपस्थित विध्यार्थी पालक शिक्षक यांनी त्याला दाद देत आई वडील शिक्षक यांच्या नात्यातील व्याख्या समजुन घेत आपल्या डोक्यावर हात ठेवून आई वडील यांच्या स्वप्न पूर्तीची शपथ या वेळी घेतली या कार्यक्रमात रामटेक चे तहसीलदार श्री रमेश कोळपे, माजी आमदार श्री आनंदराव देशमुख,श्री लक्ष्मण मेहर,
किट्स इंजिनिअरिंग कॉलेज चे श्री महात्मे, समर्थ शिक्षण संस्था सचिव श्री ऋषिकेश किमतकर, ताई गोळवलकर महाविद्यालय चे श्री इंगोले हे उपस्थित होते यावेळी या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक रामटेक किसान बायो फ्युएल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चे अध्यक्ष व प्रहार चे नेते रमेश कारामोरे व राष्ट्रीय आदर्श शिक्षण संस्था सचिव श्री मयंक देशमुख यांच्या विशेष सत्कार रामटेक चे तहसीलदार श्री रमेश कोळपे यांनी केला या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री श्रीकांत येरपुडे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री वेदप्रकाश मोकादम सर यांनी केले यावेळी मोठया संख्येने विविध शिक्षण संस्थेतील विद्यार्थी, संचालक व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.