Sunday, December 22, 2024
Homeराज्यहजारोंच्या संख्येत शाहीर कलाकार यांचा आक्रोशमानधन वाढीसाठी शाहिरांच्या ढोलकीचा हुंकार..!

हजारोंच्या संख्येत शाहीर कलाकार यांचा आक्रोशमानधन वाढीसाठी शाहिरांच्या ढोलकीचा हुंकार..!

शाहीर कलाकार यांच्या मागण्या लवकर पूर्ण करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रामटेक – राजू कापसे

कामठी कलाकार शाहीरांनी ढोलकीतून हुंकार देत हिवाळी अधिवेशन मध्ये 13 डिसेंबर 2023 ला मानधनात वाढ करावी अशी प्रमुख मागणीसाठी हजारोंच्या संख्येने “कोण आला रे,”कोण आला, महाराष्ट्रातून शाहिरांच्या बाप आला’ अशा घोषणा व विविध नारेबाजी करून शाहीर कलाकारांनी मोर्चा काढून विधानभवनावर जोरदार धडक दिली.

नारेबाजीच्या माध्यमातून आपल्या व्यथा मांडत सरकारचे लक्ष वेधले. यावेळी मोर्चात महाराष्ट्रतील कानाकोपऱ्यातून आलेल्या कलावंतांची पहाडी आवाजात पोवाडा, विविधरंगी वेशभूषा, नृत्य, ढोल, डफली वाजवून आणि घोषणाजी करून परिसर दणाणून सोडून लक्षवेधी ठरले.

भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडिया व महाराष्ट्र शाहीर परिषद यांच्या वतीने शाहीर राजेंद्र भीमराव बावनकुळे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. पारंपरिक वेशभूषेत हातात डफ घेऊन शाहीर व राज्यभरातील हजारो कलाकार मोर्चात सहभागी झाले होते. सरकार विरोधात तीव्र रोष होता.

सरकारकडून केवळ पोकळ आश्वासने देऊन मते घेतली जातात. मात्र, अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. मागण्या पूर्ण न केल्यास पुढे स्वस्थ बसणार नसल्याचा ईशारा, यावेळी देण्यात आला.साखळी उपोषण 18 डिसेंबर ते 20 डिसेंबर पर्यंत येसवंत स्टेडियम नागपूर येथे सुरू होते, 20 डिसेंबर ला शाहीर कलाकार चे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओ एस डी यांना निवेदन देण्यात आले.

वृद्ध कलावंतांच्या मानधनात दहा हजार ते बारा हजार रुपयां पर्यंत वाढ करावी, शेकडो प्रलंबित प्रकरणे लक्षात घेता जिल्हा समितीमध्ये वर्षाला 500 मानधन प्रकरणे घेण्यासाठी मजुरी द्यावी, शासनमान्य ओळखपत्र शिखर वार्षिक उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची मर्यादा २ लाख रुपयांपर्यंत करावी, वृद्ध कलावंतांना शासनाकडून सर्व आरोग्य सेवा मोफत मिळावी आणि यासाठी आधार कार्डप्रमाणे वेगळे संस्था सभासद कलावंतांना द्यावे, लोक कलावंत, शाहीर यांना राहत्या गावी घर बांधण्यास बँकेतर्फे संपूर्ण बिनव्याजी शासन शिफारसीने कर्ज द्यावे अशा मागण्या करण्यात आल्या.

यावेळी शाहीर राजेंद्र भीमराव बावनकुळे, शा.भगवान लांजेवार ,नरहरी वासनिक,सौ योगिता नंदनवार वर्धा,सौ अरूणा बावनकुळे,गणेश देशमुख भंडारा पदाधिकान्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. मुख्यमंत्री महोदयांनी कलावंतांना मानधन वाढ,विविध मागण्या व सरकारच्या योजनेअंतर्गत कलावंतांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: