गुरव समाजासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडून मोठी घोषणा
सोलापूर – राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने आज दि ११ डिसेंबर २०२२ रोजी सोलापूर येथे आयोजित महाधिवेशनाला आज नागपुरात पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांचा दौरा असताना सुद्धा वेळात वेळ काढून राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील साहेब माजी मुख्यमंत्री मा. सुशिलकुमारजी शिंदे यांच्यासह खासदार, आमदार महोदयांनी यांनी उपस्थिती लावली.
यावेळी गुरव समाजासाठी ओबीसी महामंडळाच्या अंतर्गत “संत काशीबा महाराज युवा विकास योजना” या नवीन योजनेची घोषणा करून या योजनेसाठी पहिल्या टप्प्यात 50 कोटी रूपये सुद्धा मंजूर करण्याची जाहीर घोषणा मा.मुख्यमंत्री यांनी केली आहे.आपल्या गुरव समाजासाठी ही खूप मोठी बाब असून आजच्या सोलपुरच्या ऐतिहासिक महाधिवेशनात गुरव समाजाने दाखवलेल्या एकजुटीचे फलित आहे.
आज या अधिवेशनासाठी आलेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सर्वच निमंत्रित मान्यवर व महाराष्ट्र राज्य व जवळ पास च्या राज्यातून हजारोंच्या संख्येने आलेल्या गुरव समाज बांधवांचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.आ.विजयराज शिंदे यांनी जाहीर आभार व्यक्त केले. या अधिवेशनाला खामगाव येथिल गुरव समाज लोकसेवा ट्रस्ट चे अध्यक्ष प्रशांत मेदुरकर यांचेसह दांडगे गूरुजी,गजाननभाऊ खंडार यांचे सह असंख्य समाज बांधवांनी या अधिवेशनाला हजेरी लावली.