Sunday, December 22, 2024
Homeराज्यआसनगाव स्थानकात हजारो प्रवाशांचा काळ्या फिती बांधून रेल्वे प्रशासनाचा निषेध…

आसनगाव स्थानकात हजारो प्रवाशांचा काळ्या फिती बांधून रेल्वे प्रशासनाचा निषेध…

जन आंदोलनाच्या पार्शवभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून प्रचंड पोलीस फाटा तैनात….

आसनगाव/कल्याण – प्रफुल्ल शेवाळे

आसनगाव : कल्याण कसारा कर्जत मार्गांवर लोकल वाढविणे, मेल एक्सप्रेस गाडयांना बाजूला ठेवून लोकल गाड्या वेळेवर चालवणे , जादा फेर्या सोडा, ठाणे कर्जत, कसारा शटल सेवा द्या, आसनगावं होम प्लॅटफॉर्म, आसनगावं पादचारी पूल, कल्याण कसारा तिसरी चौथी मार्गीका, महिला विशेष लोकल सोडा अशा विविध मागण्यासाठी उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या मार्गदर्शनाखाली कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशन प्रवासी संघटनाच्या वतीने गुरुवारी आसनगाव येथे सकाळीच ७ ते १० दरम्यान रेल्वे प्रवाशांनी काळी फीत बांधून आपलं शांतता मय जन आंदोलन पार पाडले.

रेल्वेला प्रशासनाला जाग यावी यासाठी काळी फित आणि पांढरा शर्ट, कुर्ता घालून प्रवास अभियानाला दहा ते बारा हजारांहून अधिक प्रवाशांनी उदंड प्रतिसाद देऊन पाठिंबा दिला. या निषेध आंदोलना प्रसंगी मा.आमदार पांडुरंग बरोरा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ठाणे महिला ग्रामीण अध्यक्ष विदयाताई वेखंडे यांनी आसनगाव रेल्वेस्थानक येथे भेट देली व रेल्वे प्रशासनाचा निषेध व्यक्त करत, प्रवासी संघटनेच्या निषेध आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला. तसेच हजारो रेल्वे प्रवाशांनी स्वतः काळी फीत लावून निषेध नोंदविला.

यावेळेस आम्ही तुमच्या सोबत आहोत,असं म्हणत प्रवाशांनी असा उत्स्फूर्त पाठींबा नागरिकांनी दिला. विशेषतः युवा वर्ग, महिला, दिव्यांग बांधवांनी स्वतःहून पुढे येत सहकार्य।केले. रेल्वे पोलीस दल,महाराष्ट्र पोलीस,लोहमार्ग पोलीस यांनीही सहकार्य करून संघटनेला एकप्रकारे पाठिंबाच दिला असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत होती.

मुंबई महानगर प्रदेशातील लोकल प्रवासी आज शब्दशः आपला मृत्यू पाठीशी घेऊनच लोकल प्रवास करीत आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील प्रचंड गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून बळी गेलेल्या प्रवाशांची लोहमार्ग पोलिसां कडील अधिकृत आकडेवारी पाहिली तरी हे ज्वलंत वास्तव आपल्या लक्षात येईल. दीर्घकाळ रखडलेले पायाभूत सुविधा प्रकल्प, प्रवाशांच्या तुलनेत न वाढणार्‍या लोकल फेर्‍या, मेल एक्स्प्रेस माल गाड्या यांना प्राधान्य देऊन ऐन गर्दीच्या वेळेतच सातत्याने लोकल उशिराने चालविणे, मा.मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही न करणे,साध्या लोकल एवजी वातानुकूलित लोकल चालविणे,सातत्याने लोकल सेवा विस्कळीत होणे या सर्व गंभीर गोष्टींमुळे आज लोकल प्रवासी प्रचंड त्रस्त आणि संकटात आहेत.

आणि संतप्त झाले आहेत. वरील सर्व बाबींचा पाठपुरावा, पत्रव्यवहार व प्रत्यक्ष बैठका घेऊन रेल्वे प्रशासना सोबत सुरू आहेच. मात्र रेल्वे प्रशासन वरील सर्वच मागण्यां बाबत हतबलता व्यक्त करीत आहे. Ac लोकल चालविण्याचा आग्रह धरणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाने मागील दहा वर्षात मुंबई (CSMT)वरून नव्हे तर ठाणे स्थानकातून सुद्धा कर्जत व कसारा मार्गावर एकही लोकल फेरी वाढविलेली नाही यावरुन लोकल प्रवाशांना कसे गृहीत धरत आहे याची आपणास कल्पना यावी.

सुखद सुरक्षित आणि संरक्षित रेल्वे प्रवास हा लोकल प्रवाशांचा अधिकार नाही काय?मागील अनेक वर्षे सुरू असलेल्या रेल्वेच्या या प्रशासकीय अनास्थे विरुद्ध मुंबई रेल प्रवासी संघाच्या आवाहना नुसार एम एमआर मधील हजारो लोकल प्रवाशांनी सुद्धा आज 22 ऑगस्ट रोजी सफेद कपडे व काळी फित लावून प्रवास केला आहे. अत्यंत शांततेच्या वातावरणात जन आंदोलन अभियान संपन्न झाले. रेल्वेने देखील रिबीन वाटून झाल्या असतील तर सहकार्य करण्याचे आवाहन केले, त्यालाही संघटनांनी प्रतिसाद दिला.

या अभियाना मध्ये महासंघ सरचिटणीस जितेंद्र विशे, कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर चे अध्यक्ष शैलेश राऊत, संघटनेचे प्रसिद्ध प्रमुख महेश तारमळे, मीना फर्डे, अनिता झोपे,ज्ञानेश्वर चंदे, अजय गावकर पत्रकार प्रफुल्ल शेवाळे,रेल्वे संघटनेचे पदाधिकारी, उद्योजक रविशेठ पाटील,रेल्वे पोलीस प्रशासन,शहापूर पोलीस प्रशासन कर्मचारी,आदी मान्यवर व रेल्वे प्रवासी उपस्थित राहून सदर उपक्रमामध्ये सहभागी झाले होते.

Prafulla Shewale
Prafulla Shewalehttp://mahavoicenews.com
मी, प्रफुल्ल शांताराम शेवाळे, रा. टिटवाळा ता. कल्याण जि. ठाणे, पदवी - विद्युत अभियंता, विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रात 20 वर्षे अनुभव. पत्रकारिता गेल्या 7 वर्षापासून करतो, मी महाव्हाईस न्यूज ला गेल्या पाच वर्षापासून परिसरातील बातम्या देण्यासाठी नेहमीच सहकार्य करतो...
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: