रात्री १२ वाजता मंदिराच्या शिखरावर जाळण्यात आले त्रिपुर…
रामटेक – राजु कापसे
त्रिपुरी पौर्णिमेच्या पवित्र सणानिमित्त रामटेक येथील सिंधुरागिरी (तपोगिरी) पर्वतावर असलेल्या श्री राम, माता जानकी आणि लक्ष्मण मंदिरात रात्री बारा वाजता हजारो राम भक्त श्री राम मंदिराच्या कलशाजवळ जमले.
भगवान श्री राम आणि माता जानकी आणि लक्ष्मण यांच्या कर्णकर्कश जयघोषात मुख्य पुजारी मोहनराव पंडे, सहकारी धनंजय पंडे आणि लक्ष्मण मंदिराचे पुजारी अविनाश पंडे, राम पंडे, मंगेश पंडे यांनी भिजलेल्या जुन्या कपड्यांना आग लावून त्रिपुरा जाळण्यात आला. यामुळे भाविक भक्तीच्या रंगात रंगून गेले होते. सर्वत्र जय श्री रामचा जयघोष सुरू झाला.
गुलाल उधळत भाविकांनी जल्लोष सुरू केला. यानंतर नवीन वस्त्रे आणि दागिन्यांनी सजलेल्या भगवानांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. शरद पौर्णिमेपासून सुरू झालेल्या या उत्सवाची त्रिपुरा दहन करून सांगता झाली, हा कार्यक्रम पाहण्यासाठी विदर्भ, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि रामटेक येथील विविध भागातून हजारो भाविक गड मंदिरात पोहोचतात, दरवर्षी रामटेक येथील भाविक मिरवणुकीत सहभागी होतात.
आणि त्रिपुरा पौर्णिमा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारों भक्तांनी उत्सुकता असते. गावाबाहेरचे लोकही या ठिकाणी येतात.गावातील नागरिक आप आपल्या घरी छतावरुन ञिपुरा जळतांना पाहण्याकरीता उभे राहतात.
उपविभागीय अधिकारी तथा गड मंदिर रिसिव्हर प्रियेश महाजन च्या मार्गदर्शनातं यात्रा ची तयारी करण्यात आली होती. तसेच सहकारी तहसीलदार रमेश कोळपे उपस्थित होते. उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते चा मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांच्या पोलीस बंदोबस्त होता. दी. 27 नोव्हेंबर ला रामटेक ला मंडई होइल.