खोट्या लाभार्थ्यांची व वाहन धारकांच्या चौकशी साठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन…
नांदेड – महेंद्र गायकवाड
देगलूर व बिलोली तालुका हा सीमावर्ती भागात येत असल्याने या दोन्ही तालुक्यातील वाळू खऱ्या लाभार्थ्यांना न देता कांही दलालमंडळी तेलंगनात व कर्नाटक राज्यात महाराष्ट्राच्या हजारो ब्रास वाळूची विक्री करीत असल्याने शिवसेना व इतर संघटनेच्या कांही पदाधिकाऱ्यांनी ठेकेदार व खोट्या लाभार्थ्यावर कारवाई करण्यात यावी.
या मागणीसाठी देगलूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे. परंतु प्रशासनातील अधिकाऱ्यांशी ठेकेदार व दलाल यांचे आर्थिक हितसंबंध असल्याने कारवाई कुणावर होणार अशी चर्चा ऐकावंयास मिळत आहे.
देगलूर व बिलोली तालुक्यातील सगरोळी, तमलूर, शेकापूर, इतर ठिकाणाहुन मोठ्या प्रमाणात वाळूची अवैध तस्करी होत आहे. सदरील वाळू डेपोहून खोट्या लाभार्थ्यांच्या नावे परवानगी काढुन एकाच पावतीवर बेकायदेशिररित्या दोन ते तीन वेळा हायवा ट्रक या वाहनाच्या सहाय्याने सर्रासपणे बेकायदेशिररित्या वाळूची शेजारील कर्नाटक राज्यामध्ये विक्री करण्यात येत आहे.
व परिसरातील ज्या लोकांना खरोखर वाळूची गरज आहे, त्या लोकांचे ऑनलाईन करण्यात येत नाही, खऱ्या लाभार्थ्यांना वेळ संपली, साईट बंद आहे, उद्या बघूया अशा प्रकारे उडवाउडवीची उत्तरे देवून खऱ्या लाभार्थ्यांची दिशाभूल करण्यात येत आहे.
सदरील प्रकरणात मोठया प्रमाणात दलाल दलालामार्फत शासनाची दिशाभूल करून शासनाचे सर्व नियम धाब्यावर ठेवून सर्रासपणे वाळू विक्री करण्यात येत असल्याचे आंदोलकानी म्हण्टले आहे. वरील प्रकरणी सखोल चौकशी करून आजपर्यंत ज्या लाभार्थ्याच्या नावाने रेती ऑनलाईन केलेली आहे.
त्या लाभार्थ्यांची चौकशी करण्यात यावी व तो कोणत्या कामाकरीता वाळू ऑनलाईन करून त्याचा वापर केला आहे, याची चौकशी करून चौकशीअंती खोट्या लाभार्थ्यांवर . वाहनधारकांवर कायदेशिर कठोर कारवाई करण्यात यावी जेणेकरून पुढील होणारी गौणखनिजची लूट व शासनाची फसवणूक थांबवून खऱ्या लाभार्थ्यास याचा लाभ होईल.
ज्या ठिकाणी ऑनलाईन करण्यात आले आहे, त्या ठिकाणी ऑनलाईन करणाऱ्याची व करून घेणाऱ्याची सुध्दा सखोल चौकशी करून त्याचे परवाना रद्द करून त्याच्यावर पोलीस कारवाई करण्यात यावी.
अन्यथा शिवसेनेच्या वतीने व संभाजी ब्रिगेडच्या वतीने दिनांक 20 मे रोजी तहसिल कार्यालय देगलूर समोर बेमुद्दत धरणे आंदोलन करण्यात ईशारा देण्यात आला होता. त्यानुसार शिवसेना समन्वयक नागनाथ वाडेकर,जेजेराव शिंदे,संजय जोशी यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे.