वाशिम प्रतिनिधी
चंद्रकांत गायकवाड
मालेगाव : – शील,समाधी,प्रज्ञा यामुळे माणूस मनावर नियंत्रण ठेवू शकतो आणि तोच दुःख मुक्तिचा मार्ग आहे तथागत बुद्धांनी सांगितलेल्या या मार्गावर चालण्याचा सम्यक संकल्प करणारे सुख प्राप्ती करून दुःख मुक्त होऊन जिवनात यशस्वी होऊ शकतात असे प्रतिपादन पूज्य भदंत बोधिपालोजी यांनी आपल्या धम्मदेसनेत सांगितले.
अखिल भारतीय बौद्ध भिक्खू संघ,बोधगया ( बिहार ) चे अनुसंघनायक पूज्य भदंत बोधिपालोजी महास्थविर,संस्थापक अध्यक्ष,लोकुत्तरा महाविहार,यांच्या समवेत पूज्य भदंत काश्यपजी,महाथेरो,पूज्य भदंत विनयशीलजी लोकुत्तरा महाविहार अजिंठा रोडवरील चौका,छत्रपती संभाजी नगर ( औरंगाबाद ) हे स्थानिक धम्मस्थान स्तूप येथे आले असता आयोजित धम्मदेसनेत ते पुढे म्हणाले की,प्रत्येकाला सुखाचीच इच्छा असते आणि कारणाशिवाय सुख,दुःख उत्पन्न होत नाही. व्यसनधीनते मुळे माणसाला दुःख होते जर मानवाने सम्यक संकल्प केला तरच दुःख दूर करता येते.त्याचा सम्यक मार्ग म्हणजे शील,समाधी,प्रज्ञा हाच आहे त्यांनी आपल्या प्रवचनात पूढे सांगितले की,शीला च्या आचरणातून काया वाचाची कृतिशीलता नियंत्रित करता येते
त्यातून विकार नष्ट होतात मात्र क्लेशाचा शोध घेण्यासाठी सम्यक समाधी महत्वाची आहे तिच्या सरावाने मनावर नियंत्रण ठेवता येते द्वेष,विकार, क्लेश व चित्ताचे विकार समाधीतून नष्ट होतात माणसाची मिथ्या दृष्टी, मिथ्या धारणा घालवीण्यासाठी प्रज्ञा उत्पन्न व्हावी लागते एकंदरीत शील-समाधी यांचा लाभातूनच प्रज्ञा उत्पन्न होते हे ज्याला शक्य होईल तो धम्मात परिपक्व होतो हाच दुःख मुक्तीचा मार्ग आहे,म्हणून बौद्ध अनुयायांनी यांनी धम्माचरण करणे गरजेचे आहे असे आपल्या प्रवचनात सांगितले.
या भिक्खू संघाच्या भेटी दरम्यान त्यांच्या समवेत उपासक,आयुष्यमान दादासाहेब वाकोडे ( उपाभियंता ),आयुष्यमान रामकृष्ण इंगळे ( विकास अधिकारी जिवन विमा ),आयुष्यमान राजेंद्र नन्नवरे ( विज मंडळाचे ठेकेदार ) रमेश तायडे ( बॅंक उपशाखाधिकारी ) बौध्दाचार्य भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संस्कार विभाग प्रमुख हरीशचंद्र पोफळे,बौध्दाचार्य दीपक घुगे व कैलास इंगळे,अरविंद पखाले, भाऊराव पखाले,भानुदास वानखेडे,दीपक पखाले,इंजिनिअर अक्षय भारसागळे,राहुल वानखेडे, इंजिनिअर स्वाती पखाले,मयुरी पखाले, दिव्या सावंत,निता पखाले,यश सावंत,रंजना भारसागळे,पुजा जावळे यांनी भिक्खू संघाचे पुष्पाने स्वागत केले भिक्खू संघाला उपासिका ललिता पखाले व सुधाकर पखाले यांनी भोजनदान देण्याचे कुशल कम्म केले भिक्खू संघाच्या आगमनचा आणि प्रवचनाचे विधीवत पूजा, वंदना,याचना ची याची पूर्ण जवाबदारी जेष्ठ बौध्दाचार्य पुंडलिक पखाले यांनी सांभाळली तर आभार प्रदर्शन सुधाकर पखाले यांनी केले.