मागील आठवड्यात मुर्तिजापूर चे आमदार हरिष पिंपळे आणि वारकरी अर्जुन लोणारे यांची ऑडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे सध्या मतदार संघात चर्चेचा विषय झाला आहे, तर एका व्हाट्सअप ग्रुप वर भ्रष्टाचाराच्या विषयी सुरू झालेल्या चर्चेमुळे हा प्रकार घडला आहे. तर अर्जुन लोणारे हे कोण आहेत. अर्जुन लोणारे हे पंधरा वर्षांपूर्वी आमदार हरीश पिंपळे यांच्यासोबत शेगाव वारी सुरू करणारे, हरीश पिंपळे आणि अर्जुन लोणारे हे चांगले जवळचे मित्र होते. 2014 ला हरीश भाऊ आमदार झाल्यानंतर हरीश भाऊंनी आपल्या जवळच्या लोकांवर दुर्लक्ष केल्यामुळे अनेक जवळचे लोक दूर गेले. त्यामध्ये अर्जुन लोणारे सुद्धा होते अर्जुन लोणारे हे तेच व्यक्ती आहेत ज्यांनी हरीश भाऊ आमदार व्हावेत यासाठी गजानन महाराजांकडे साकडे घातले होते.
व्हाट्सअप ग्रुप वर अयोध्येतील कामाविषयी चाललेल्या चर्चेमध्ये हरीश भाऊंना एवढा राग का आला ?. खरतर चर्चा अयोध्येच्या कामाविषयी सुरू होती मात्र अर्जुन लोणारे यांनी मूर्तिजापूर च्या मुख्य रस्त्याबाबत प्रश्न विचारले असता यावर हरीश भाऊ पिंपळे यांचा पारा चढला त्यांनी थेट लोणार यांना फोन लावून विचारणा केली त्यामध्ये लोणार यांना मारण्याची धमकी सुद्धा दिली सदर ऑडिओ क्लिप ही वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसरत आहे. एवढ्यावरच समाधान झाले नाही तर शहर पोलीस ठाणेदार यांच्याकडून अर्जुन लोणारे यांच्यावर दबाव टाकण्याच्या प्रयत्नही करण्यात आला मात्र धमकीला ज जुमानता लोणारे यांनी तटस्थ भूमिका घेत, गुन्हे दाखल करा पण माफी मागणार नाही, मलाही माझं मत मांडण्याचा अधिकार आहे अशी ठाम भूमिका घेतल्याने त्यांना परत पाठवण्यात आले.
मुर्तिजापूर शहरातील मुख्य रस्त्याचे काम गेल्या 2017 पासून सुरू आहे. मात्र आजपर्यंत हे काम पूर्ण झालं नसल्याने या कामाविषयी अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. या रस्त्याची दररोज डागडुजी सुरू असल्याने ये जा करणाऱ्यांना बराच त्रास होतो. मात्र याबाबत काही बोलले तर अश्या धमक्या सुरू होतात. रस्त्याचे काम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे असून सुध्दा काही कमिशन घेणारे नगरसेवक मुंग गिळून गप्प आहेत. तर अनेक जण ठेकेदार असल्याने भाऊचा थेट विरोध करत नाही. कमिशन पोटी यांनी संपूर्ण गावातील रस्त्यावर रस्ते बांधले यामुळे रस्त्यांची उंची वाढत आहे आणि रस्त्यालगतच्या घरांची खोली वाढत आहे, मात्र याची कुणाला पर्वा नसून काम दाखवून कमिशन लाटणे एवढच आहे. शहरातील एक व्यक्ती, जो वारकरी आहे, त्याने याबाबत बोलले तर तर मारण्याच्या धमक्या आमदार साहेब देतात.
भाऊच्या आजूबाजूची गॅंग एवढी खतरनाक आहे ते भाऊच्या कानात सतत जवळच्या व्यक्ती विषयी बोलत राहतात, त्यामुळे त्याच्या जवळचे खास कार्यकर्ते दूर गेले, हे कार्यकर्ते चारपाच पक्षातून फेर्या मारून भाऊचे जवळचे कार्यकर्ते बनले आणि हेच भाऊचे सल्लागार सुद्धा आहेत आणि वेळोवेळी भाऊचे कान भरून त्यांना चिथावणी देतात, त्यामुळे ते चिडतात मात्र या गँगला भाऊ जोपर्यंत दूर करणार नाही तोपर्यंत भाऊचं काही खरं नाही. ही तीच गँग आहे जी बाहेर गावात बार मध्ये मार खाते. विधानसभा निवडणुक सुरु आधीच भाऊची बदनामी सुरु झाल्याने भाजपा त्यांना वगळू सुद्धा शकते. अजून तर निवडणूक लागायची आहे…..