न्युज डेस्क – मुंबईतून खुनाची खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील जुहू परिसरात मालमत्तेच्या वादातून मुलाने आपल्या ७४ वर्षीय आईची निर्घृण हत्या केली. गुन्हा केल्यानंतर आरोपी मुलाने नोकरासह मृतदेह माथेरानच्या खाडीत फेकून दिला.
याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपी मुलगा सचिन आणि नोकर लालू यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुहू येथे राहणाऱ्या वीणा कपूरचा मुलगा सचिनसोबत मालमत्तेवरून वाद होता. भांडण इतके वाढले की, नोकरासह मुलाने लाथा-बुक्क्यांनी व बॅट ने बेदम मारहाण केली.
न्यायालयाने दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली
पोलिसांनी सांगितले की, महिलेची हत्या केल्यानंतर तिच्या मुलाने घरकाम करणाऱ्या नोकरासह मृतदेह एका पेटीत बांधून माथेरानच्या खाडीत फेकून दिला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांनाही 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपी मुलगा सचिनने मृतदेह लपवण्यासाठी नोकर लालूची मदत घेतली. मृतदेह एका पेटीत भरून तो स्वतः माथेरानला गेला तर नोकराने लालूंना लोकल ट्रेनने बोलावले. यानंतर दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावले
कश्या प्रकारे खुनाचे गूढ उकलले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीणा यांचा दुसरा मुलगा परदेशात राहतो. खूप दिवस झाले आईसोबत बोलण न झाल्याने सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यास सांगितले. सुरक्षा रक्षक बेपत्ता झाल्याची नोंद केल्यानंतर पोलीस तपासासाठी मृत वीणाच्या घरी पोहोचले.
तपासादरम्यान वीणासोबत तिचा मुलगा सचिन आणि नोकर लालू राहत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सोसायटीत बसवलेले सीसीटीव्ही तपासले असता संपूर्ण प्रकरण उघड झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी मुलगा सचिन त्याच्या नोकरासह बॉक्स घेऊन जाताना दिसत आहे. या संदर्भात पोलिसांनी कडक चौकशी केली असता आरोपी मुलाने गुन्ह्याची कबुली देत मालमत्तेच्या वादातून आईची हत्या केल्याचे सांगितले.