Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीअक्षरशः अंगावर काटे उभे राहतील असं हे टोळीयुद्ध; ‘खून का बदला खून…सूडभावनेतून...

अक्षरशः अंगावर काटे उभे राहतील असं हे टोळीयुद्ध; ‘खून का बदला खून…सूडभावनेतून आकाश वाकोडे याची हत्या…

मुख्य तीन आरोपींना मुंबईतून अटक – अद्याप हत्या प्रकरणातील आठ आरोपी अटकेत. वाचा आकाश वाकोडे याच्या हत्येचा पूर्ण घटनाक्रम

अकोला : अकोल्यात अक्षरशः अंगावर काटे उभे राहतील असं टोळीयुद्ध पाहायला मिळालं होतंय. अकोला शहरातील चिखलपुरा, न्यू तापडियानगर परिसरात ‘खून का बदला खून…’ या सूडभावनेतून सुहास वाकोडे याचा भाऊ आकाश वाकोडे याची पाच ते सहा जणांनी तलवार, चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. ही घटना ‘१२ ‘मे’ २०२३’ रोजी घडली होती.

या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी मुख्य तीन आरोपींना आज मुंबईतील उल्हासनगरातील एका फ्लॅटमधून अटक केली आहे. या हत्याकांडातील जवळपास आठ लोक सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. दरम्यान दोघांमध्ये सुरू असलेली वर्चस्वाची लढाई इतकी टोकाला गेली की तरुणांनी थेट धक्कादायक पाऊले उचलली.

वर्चस्वाच्या वादातून मोठा घातपात होऊन दोनही गटात दोघांची हत्या तर दोघे जखमी झाले होते. गेल्या बारा महिन्यांपूर्वी विनोद वामन टोंबरेंवर (वय ३५, पंचशील नगर, खरप, अकोला) याची हल्ला करुन हत्या करण्यात आली. तर हल्ला करणारा मारेकरी सुहास वाकोडे हा देखील जखमी झाला होता. आता आरोपी सुहास वाकोडे याच्या भावाचा देखील कट रचूनं ८ लोकांनी खून केला.

काय होतंय नेमकं प्रकरण?

तारीख ‘१२ ‘मे’ २०२३’ रोजी आकाश वाकोडे याच्या बहिणीचा विवाह सोहळा पार पडला, लग्नानंतर काही सामान पोहोचण्यासाठी ‘तो’ मित्र गौरव मानकर याच्या बरोबरीने गेला. रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास घरी परतीच्या प्रवासावर असताना अचानक चिखलपुरा न्यू तापडिया नगर रस्त्यावर एका चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

त्यानंतर चारचाकी वाहनातून ३ जण लोक खाली उतरले, अन दोघांवर तलवारीने हल्ला चढवला. या घटनेत आकाश वाकोडे आणि गौरव मानकर हे गंभीर जखमी झाले. यामध्ये आकाश वाकोडे याचा जागीच मृत्यू झाला. तर गौरव हा गंभीर जखमी होता. याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुख्य तीन आरोपींना मुंबईतून अटक-

दरम्यांन या आता प्रकरणात आज मुख्य तीन आरोपींना अकोला पोलिसांनी गजाआड़ केलं. प्रमोद ऊर्फ पिंटू टोबरे, गणेश लांडगे आणि अनिल इंगळे असं या तिघांची नावे आहे. घटनेपासून तिघेही फरार होते आता सिव्हिल लाइनचे ठाणेदार भाऊराव घुगे यांना तीनही आरोपी मुंबईत एका फ्लॅटवर दडून असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने मुंबईकडे पथक रवाना केले. पोलिसांनी मुंबई उल्हासनगरातील फ्लॅटमधून तिघांना अटक केली. आज शनिवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना १९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

आकाश वाकोडे नेमका कोण?

सुमारे गेल्या बारा महिन्यांपूर्वी स्व. विनोद टोंबरे आणि त्याच्या मारेकऱ्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरु होती, या लढाईचं रूपांतर हत्येपर्यंत पोहोचलं होत. सुहास वाकोडे आणि त्याच्या साथीदारांनी विनोदच्या छातीवर आणि अंगावर चाकूने वार करीत त्याला गंभीर जखमी केले, त्यात विनोद याचा जागीचं मृत्यु झाला होता. तर मारेकरी सुहास वाकोडे हा देखील या घटनेत जखमी झाला होता. या घटनेनंतर सुहास वाकोडेसह त्याच्या साथीदारांना अकोला पोलिसांकडून अटक झाली. तेव्हापासून सुहाससह ४ जण अटकेत आहे.

‘खून का बदला खून…’ मग झालंय..

आपल्या भावाला जीवानं ठार मारलं. भाऊ मरण पावल्याचे दुःख काय असते हे सुहास वाकोडे याला समज द्यायचं निश्चित केलं. मृतक विनोदचा भाऊ प्रमोद ऊर्फ पिंटू टोबरे (वय ३९) यानं सुहास भाऊ आकाश वाकोडे याच्या हत्येचा कट रचाला. अन् ‘खून का बदला खून…’ या सूडभावनेतून अखेर आकाश’ला संपवलं. दरम्यान आकाश वाकोडे हा आरोपी सुहास वाकोडे याचाच सख्खा भाऊ होता.

मारेकऱ्यांनी असा रचला आकाशच्या हत्येचा कट-

प्रमोद ऊर्फ पिंटू टोबरे, गणेश लांडगे, अनिल इंगळे, तेजस हिंगणकार, ओम शिरसाठ, शुभम शिरसाठ, अक्षय शेगोकार, सुमित उर्फ़ अक्षय सरकटे हे आरोपी. या हत्याप्रकरणाचा पूर्ण मास्टरमाईंड प्रमोद टोबरे हा होता. तर त्याला मुख्य साथ दिलीय गणेश आणि अनिल इंगळे या दोघांनी. दरम्यान या घटनेत वापरण्यात आलेलं चारचाकी वाहन हे आरोपींनी ऑनलाइन ८० हजार रुपयात खरेदी केलं होतं.

त्यानंतर हत्येच्या दिवशी पाच जण कारमध्ये बसले. ज्यामध्ये तेजस हिंगणकार हा गाडी चालवत होता तर सुमित सरकटे हा समोर बसला होता. पाठीमागे प्रमोद, गणेश आणि अनिल हे तिघे जण बसले होते. तर मोटर सायकलवर शुभम शिरसाठ आला होता. विशेष म्हणजे आकाश कुठे जातोय? निघाला का? त्याच्या प्रत्येक गोष्टींवर ‘अक्षय शेगोकार’ यानं पाळत ठेवली.

रात्री पावणे दहा वाजता मृत आकाश वाकोडे आणि गौरव मानकर हे दोघेजण घराकड निघाले आहेत. आपण येऊन जा.. असं अक्षय शेगोकारनं फोनद्वारे प्रमोद अन् साथीदारांना कळवलं. आकाश मोटरसायकलनं चिखलपूरा रस्त्याने घराकड़ जात असतानाच वाटेतच त्याच्या दुचाकीला मारेकऱ्यांनी धड़क दिली अन् दोघेही खाली कोसळले.

त्यानंतर गाडीतून प्रमोद, गणेश आणि अनिल हे तिघे जण उतरले आणि आकाशवर तलवारींना सपासप वार केले, त्यात त्याला जागीचं ठार केलं. सुदैवानं गौरव मानकर हा घटनास्थळ पळून गेल्याने तो वाचलाय.

आता सुहास वाकोडे नेमका कोण? …

सुहास वाकोडे याच्यावर सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारीवर आळा बसावा यासाठी, अकोल्याचे तत्कालीन पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी सुहासवर एमपीडीए नुसार कारवाई केली होती.

या कारवाईत त्याला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. एमपीडीए अंतगर्त शिक्षा भोगून कारवाई पूर्ण झाल्यानंतर सुहास कारागृहातून सुटला होता अन् त्याने विनोद ठोंबरेच्या हत्या केली होती. त्यानंतर पुन्हा तो कारागृहात शिक्षा भोगत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: