Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीया दलित नेत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी ओकली गरळ...नेत्याला पोलिसांनी केली अटक...

या दलित नेत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी ओकली गरळ…नेत्याला पोलिसांनी केली अटक…

न्यूज डेस्क – देशात दिवशेंदिवस धार्मिक तेढ निर्माण करणारे अनेक बिनडोक्याची माणसे वक्तव्य करतात, मात्र आता तर तेलंगणात एका दलित नेत्याने संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी दलित नेत्याला अटक केली. आरोपीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो म्हणत आहे की, ‘आज आंबेडकर जिवंत असते तर मी त्यांना मारले असते’. जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण…

दलित नेते आणि राष्ट्रीय दलित सेनाचे (Rashtriya Dalita Sena) संस्थापक हमारा प्रसाद यांनी काही दिवसांपूर्वी बाबासाहेब डॉ.भीमराव आंबेडकर यांच्यावर एक व्हिडिओ बनवला होता. यामध्ये प्रसादने डॉ.आंबेडकरांचे ‘रिड्स इन हिंदूइझम’  (Riddles in Hinduism: An Exposition to Enlighten the Masses) हे पुस्तक दाखवले.

व्हिडिओमध्ये तो डॉ. आंबेडकरांविरोधात अनेक आक्षेपार्ह गोष्टी बोलताना दिसत आहे. आज आंबेडकर हयात असते तर गोडसेने गांधींना ज्या प्रकारे मारले होते त्याचप्रमाणे त्यांनी त्यांची हत्या केली असती, असेही ते म्हणाले. याच व्हिडिओमध्ये हमारा प्रसाद यांनी डॉ.आंबेडकरांवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोपही केला आहे.

डॉ.आंबेडकरांवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या दलित नेत्याविरोधात बहुजन समाज पक्षाचे प्रमुख डॉ.आर.एस.प्रवीण कुमार यांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध 153A आणि 505(2) अन्वये एफआयआर नोंदवून आरोपीला अटक केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: