बाळापूर – सुधीर कांबेकर
बाळापूर शहरांमध्ये तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्य छञपती सेनेचा वतीने भव्य दिव्य कावड काढून बाळापूर शहर दुमदुमले होते. बाळापूर शहरांमध्ये तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्य छञपती सेनेचा वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा श्री श्रेञ नागझरी ते बाळापूर पदयाञा करुन तेलीपुरा विभागातील रत्नेश्वर भोलेनाथला जलअभिषेक केला.या कावडयाञेमध्ये हानुमानची प्रतिकृती आणुन शहर चांगलेच दुमदुमले होते.
छञपती सेना कावड मंडळाचे बसस्थानक चौकांत आगमन होताच कावडचे पुजन भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील ,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, संदीप पाटील , राऊत अमोल साबळे , तायडे ,बाळु बगाडे, शामराव शेलार, किशोरचंद्र गुजराथी , गजानन महाराज पुरी, अशोक मंडले ,गजानन खारोडे, ब्रिजमोहन मंद्रेले ,उमेशआप्पा भुसारी, योगेश ठाकुर, बंटी महाराज कानकुब्ज, निर्भंयसिंह ठाकुर ,काँग्रेस चे प्रदेश महासचिव प्रकाश तायडे, किशोर कुचके, प्रकाश श्रीमाळी, प्रितेश गुजराथी ,बबलु जडिये पञकार रमेश ठाकरे ,
रामदास वानखडे , सुधीर कांबेकर ,अमोल जामोदे यांचासह भोलेनाथ भक्तांनी कावडचे पुजन केले.ही कावड याञा अकोला नाका येथुन प्रारंभ होऊन तेलीपुरा येथील रत्नेश्वर मंदीर येथे भोलेनाथला जलअभिषेक आरती करुन उसळीचे महाप्रसादाने सांगता करण्यात आली.यावेळी कावड मिरवणुकीमध्ये बाळापूरचे ठाणेदार अनिल जुमळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.