रामटेक – राजु कापसे
कविकुलगुरु इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी अँण्ड साइंस (किटस) रामटेक मधे 19 क्लब, असोसिएशन व फोरमच्या उद्घाटन समारंभ किट्सच्या सिल्वर जुबली हाल मध्ये 16 ऑक्टोबरला संपन्न झाला.
प्रमुख अतिथी म्हणून – डॉ. संजय उत्तारवार, किट्सचे प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे, डीन डॉ. पंकज आष्टणकर, डीन, विभाग प्रमुख, प्राध्यापक सहित विविध फोरम व असोसिएशनचे प्रमुख व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रमुख अतिथी डॉ. संजय उत्तरवार मार्गदर्शनपर म्हणाले विविध् फोरमच्या संयुक्त उपक्रममुळे विद्यार्थांच्या कलागुणाला वाव मिळेल. प्रथम स्वतःच्या कैरियर विषयी गहन विचार करा. प्रयत्न करणाऱ्यांना यश नक्कीच येते. वीजन ठेऊन सकारात्मक विचार ठेवा.
प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे म्हणाले की फोरम व असोसिएसनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एकोपा व आत्मविश्वास वाढतो.संगठीतपने मोठे काम सहजतेने साध्य करता येतात.
डीन डॉ. पंकज आष्टणकर यानी विविध फोरम व असोसिएशनच्या कार्यपद्धति विषयी माहिती दिली व म्हणाले यामुळे विद्यार्थांचे कौशल वाढते. संचालन सागर जीवने व शैली गोवर्धन तर धन्यवाद केतकी पिपरोधे यांनी केले.