Sunday, December 22, 2024
Homeराज्यरामटेक | चोर महिलांनी भरदिवसा शेतकऱ्याचे २० हजार रुपये लुटले...

रामटेक | चोर महिलांनी भरदिवसा शेतकऱ्याचे २० हजार रुपये लुटले…

रामटेक – राजु कापसे

रामटेक पोलीस ठाण्यांतर्गत कवडक (दुधाळा) येथील गजानन गोविंदा बालगोटे (वय ७२) यांच्या पिशवीतिल दोन अज्ञात महिला चोरट्यांनी ब्लेडने वार करून 20 हजार रुपये चोरल्याची घटना 24 जुलै रोजी दुपारी 1.30 वाजता युनियन बँकेजवळ घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी गजानन बालगोटे यांनी मजुरांची मजुरी देण्यासाठी स्टेट बँकेतून 20 हजार रुपये काढून पिशवीत ठेवले आणि आधारकार्डची झेरॉक्स काढण्यासाठी झेरॉक्स दुकानात गेले. झेरॉक्स काढत असताना त्याच्याजवळ दोन महिला उभ्या होत्या.

पिशवीला ब्लेड ने चिरा मारूंन वीस हजार रुपये काढून घेतल्यानंतर महिला पसार झाल्या. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर गजानन बालगोटे यानी रामटेक पोलिसात तक्रार दिली। भरदिवसा चोरी झाल्याने रामटेकमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: