Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीATM लुटण्यासाठी गेलेल्या चोरट्यांची अशी झाली फजिती...व्हिडिओ व्हायरल

ATM लुटण्यासाठी गेलेल्या चोरट्यांची अशी झाली फजिती…व्हिडिओ व्हायरल

न्युज डेस्क – देशातील प्रत्येक ATM मध्ये कॅश जरी नसली तरी मात्र तेथील CCTV कॅमेरे सक्रीय असतात. बीड जिल्ह्यातील यलंब घाट परिसरातील ATM मशीन चोरून नेणाऱ्या चोरट्यांची करामत CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. सोशल मिडीयावर या मूर्ख चोरांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड च्या यालाम्घात परिसरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे एटीएम मशिनमधून चोरीचा मोठा डाव उधळला.. एर्टिगा कारचा वापर करून चोरट्यांनी #Maharashtrabank चे ATM मशीन फोडल्याची खळबळजनक घटना CCTV मध्ये कैद झाली.. ही घटना 6 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली.

1 मिनिटाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एटीएमच्या बाहेर एक कार उभी असल्याचे दिसून येते. प्रथम चोरट्यांनी कारला दोरी बांधली. त्यानंतर बाहेर उभा असलेला दुसरा चोरटा एटीएममध्ये घुसतो आणि एटीएमला दोरीने घट्ट बांधतो. एकंदरीत एटीएम मशीन गाडीच्या साह्याने बाहेर काढण्याची त्यांची योजना होती.

जेव्हा कार आणि एटीएम दोन्हीमध्ये दोरी बांधली जाते. त्यानंतर कारच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या चोराला गाडी वेगाने पुढे सरकवण्यास सांगितले जाते. चालकाने गाडी वेगात पुढे नेली की एटीएम मशिनवर दाब येतो आणि ते उखडून बाहेर येते. त्याच्यासोबत चोरही जमिनीवर पडतो.

चोराने आपला कट अंमलात आणण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो यशस्वी होऊ शकला नाही. कारण स्थानिक पोलिसांना चोरीच्या घटनेची माहिती एटीएममध्ये बसवण्यात आलेल्या सेफ्टी सर्व्हिसमधून मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून एटीएम चोरीपासून वाचवले. मात्र, तोपर्यंत मुखवटा घातलेले चोरटे पळून गेल्याने त्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले.

खाली व्हिडीओ पाहू शकता…

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: