Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीधर्माबाद येथील एलोरा वाईन शॉप मालकाच्या घरून चोरट्यांनी पाच लाख रुपयाची बॅग...

धर्माबाद येथील एलोरा वाईन शॉप मालकाच्या घरून चोरट्यांनी पाच लाख रुपयाची बॅग पळविली…

नांदेड – महेंद गायकवाड

धर्माबाद शहरातील एलोरा वाईन शॉपचे मालक व्यंकटेश गौड यांच्या घरी जबरी चोरी करून चोरट्यांनी पाच लाख रुपये चोरी केल्या प्रकरणी धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धर्माबाद येथील एलोरा वाईन शॉपचे मालक व्यंकटेश गौड काशा गौड कंदननुरी वय 51 वर्षे दिनांक 8 सप्टेंबर रोजी रात्री आपले वाईन शॉप मध्ये वाईनची विक्री व्यवसाय करून अंदाजे पाच लाख रूपये व पांढरी बॅग घरातील बेडरूमच्या पलंगावर ठेवुन फ्रेश होण्यसाठी बेडरूम समोरील रूम मध्ये गेला असता यातील अज्ञात आरोपीने घरात प्रवेश करून फिर्यादीचे आईस चाकुचा धाक दाखवुन तिच्याशी झटापट करून तिला ढकलुन देऊन पैशाने भरलेली अंदाजे पाच लाख रूपयाची पांढरी बॅग जबरीने चोरून नेली आहे.

या प्रकरणी व्यंकटेश गौड काशागौड कंदननुरी, वय 51 वर्षे, व्यवसाय एलोरा वाईन शॉप रा. गांधीनगर मटन मार्केट जवळ धर्माबाद ता. धर्माबाद जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे धर्माबाद गुरनं 220/2022 कलम 394, 452 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास सपोनि / श्री कत्ते हे करित आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: