सांगली – ज्योती मोरे.
सांगली इस्लामपूर आदी ठिकाणी चोऱ्या करून पसार झालेल्या रोहित बाजीराव आखळे. वय 32,राहणार- केदारवाडी, तालुका- वाळवा.या गुन्हेगारास आज सांगली ग्रामीण पोलीसांनी ताब्यात घेतले. सांगलीतील संजीवनी क्लिनिक मधून 3 लाख 30 हजार रुपये,तर इस्लामपूर मधून 1400 रुपये रोख आणि एक जर्किन चोरले होते. आरोपी रोहित आखळे याच्यावर सांगली,सातारा, रायगड, कोल्हापूर,पुणे आदी जिल्ह्यात एकूण 22 गुन्हे दाखल आहेत, तर आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
त्याच्याकडून सांगली पुण्यातील 2 लाख 54 हजार रोख, स्क्रू ड्रायव्हर, हेल्मेट, सॅक तर इस्लामपूर मधून 1400 रुपये रोख आणि जर्किन असा एकूण 2 लाख 55 हजार400 रुपये मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक अचल दलाल, सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक किरण मगदूम, सहाय्यक पोलीस फौजदार बाळकृष्ण गायकवाड, पोलीस हेडकॉन्स्टेबल रमेश कोळी, पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष माने,पोलीस नाईक सचिन मोरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अरुण पाटील, संदीप पाटील, पोलीस शिपाई स्वप्निल नायकवडे आदींनी केली.