मूर्तिजापूर तालुक्यातील हेंडज येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय जवळ रस्त्याच्या कडेला पडलेल्या इसमास व त्याच्या 8 ते 9 महिन्याच्या बालकास पत्रकारांनी केले पोलीसांकडे सुपूर्त…
मूर्तिजापूर तालुक्यातील हेंडज येथील राष्ट्रीय महामार्ग 53 वरील शासकीय तंत्रनिकेतन महाविघालाय नजिक रस्त्याच्या कडेला अंधाराच्या काळोख्यात मध्यंधुंद अवस्थेत पडून असलेल्या अंदाजे 35 वर्षीय इसमास व त्याच्या सोबतच असलेल्या 8 ते 9 महिन्याच्या चिमुकलीस पत्रकार प्रतिक कुऱ्हेकर, अर्जुन बलखंडे व समाज कोमल तायडे यांनी मूर्तिजापूर ग्रामिण पोलीसांकडे सुखरूप सुपूर्त करून पत्रकारितेतली माणुसकी दाखवली.
17 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास माना येथून वृत्तसंकलन करून मूर्तिजापूर येथे परत जात असतांना पत्रकार प्रतिक कुऱ्हेकर व अर्जुन बलखंडे यांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर हेंडज नजीक शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालया जवळ असलेल्या कोमल तायडे यांच्या भारत पेट्रोल पंपा नजिक रस्त्याच्या कडेला एक इसम आपल्या दुचाकी सह पडलेला दिसला पत्रकार यांनी आपली गाडी थांबून तिथे पाहणी केली असता घटना स्थळी एक 35 वर्षीय इसम आपल्या 8 ते 9 महिन्यांच्या चिमुकली सह रस्त्यावर पडून असल्याचे निदर्शनास आले.
त्या इसमाची विचारपूस केली असता तो इसम मध्यधुंद अवस्थेत एका चिमुकलीस घेऊन अर्धा ते एक तासांपासून पडला असल्याचे समजले. सदर इसम मध्यंधुंद अवस्थेत असल्याने त्यास बोलता सुद्धा येत नव्हते. त्यात वरतून पाऊसही सुरु पावसात भिजल्याने चिमुकली थंडीत कुडकुडात असल्याने कसलाही विलंब न करता पत्रकार प्रतिक कुऱ्हेकर यांनी ग्रामिण पोलीस स्टेशन चे ठाणेदार गोविंद पांडव यांना घटनेची माहिती दिली व समाज सेवक तथा मातोश्री पेट्रोल पंपाचे संचालक कोमल तायडे पत्रकार अर्जुन बलखंडे यांच्या सहकार्याने त्या इसमास व चिमुकलीस मूर्तिजापूर ग्रामिण पोलिसांच्या स्वाधीन सुखरूप सुपूर्त केले.
घटनेची दाखल घेत ठाणेदार गोविंद पांडव यांनी त्यांच्या सहकार्यासह तात्काळ त्या इसमच्या घराचा व गावाचा शोधमोहीम सुरु करून त्या इसमास व चिमुकलीस दुधलाम येथे रात्री 11 वाजता आपल्या आई कडे सोपाविले व आपली तत्परता दाखविली.