Viral Video – ज्या वयात आधाराशिवाय उभे राहता येत नाही, त्या वयात एका वृद्ध आईने आपल्या मुलीला भेटण्यासाठी तीनचाकी सायकल चालवत 170 किलोमीटर अंतर गाठलं. राजगड जिल्ह्यातील पाचोर-बियाओरा दरम्यानच्या महामार्गावर अम्मा आणि तिचा खडतर प्रवास कॅमेऱ्यात कैद झाला आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
7 जून रोजी ‘हम लोग’ (@ajaychauhan41) या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले होते- नातेसंबंधांचे महत्त्व, अशोकनगर राजगड: बससाठी पैसे नव्हते तर तीनचाकी सायकलने, आठ दिवसांत 170 किमीचा प्रवास करीत वृध्द महिला मुलीला भेटण्यासाठी आली होती.
म्हातारपणी एकटीने ट्रायसायकलने एवढा लांबचा प्रवास करणे सोपे काम नाही. या प्रवासात दादींना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. अम्मा यांना आपल्या मुलीपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे आठ दिवस प्रवास करावा लागल्याचा दावा करण्यात आला.
मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की हे प्रकरण मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातील आहे. इकडे अशोक नगरात राहणाऱ्या लिबियाबाई (वृद्ध स्त्री) ची मुलगी राजगड जिल्ह्यातील पाचोर भागातील उदनखेडी गावात राहते.
महिला आपल्या मुलीला अनेक दिवसांपासून भेटण्यासाठी आतुर होत्या पण तिला भेटायला जाण्यासाठी तिच्याकडे बसच्या भाड्या एवढे पैसे नव्हते. अनेक बसचालकांनाही तिने आपली अवस्था सांगितली पण कोणीही तिला बसवले नाही. अशा परिस्थितीत त्यांनी 170 किमी दूर आपल्या मुलीकडे ट्रायसायकलवर जाण्याचा निर्णय घेतला.
हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. यामध्ये म्हातारी अम्मा एका हाताने तिची ट्रायसायकल ओढताना आणि दुसऱ्या हाताने तिचे पुढचे चाक पुढे सरकवताना दिसते.
Daughter have no time meet her old aged mother, but despite having no money 4 fare, she travelled 170 Kms in 8 days by her tricycle 2 meet her daughter. #TejRan #tejranmoment #sexualharassmentddca #DimpleKapadia #Aurangzeb #RepoRate pic.twitter.com/v2boXniYSx
— Maya Sharma 🇮🇳 (@iammaya_sharma) June 8, 2023
सायकलवर भरपूर सामान भरलेले असते. दरम्यान, व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीने तिला विचारले की, अम्मा कुठे चालली आहेस? उत्तरात ती म्हणते – पाचोर. यावर त्या व्यक्तीने तुम्ही कुठे राहता असे विचारले. यावर अम्मा म्हणतात – राजगढ. हा व्हिडिओ इथेच संपतो.