Sunday, December 22, 2024
Homeराज्यगांधीग्राम पुलावरून एका वेळेस २ ते ४ दुचाकी वाहने ढकलत नेण्यास हरकत...

गांधीग्राम पुलावरून एका वेळेस २ ते ४ दुचाकी वाहने ढकलत नेण्यास हरकत नाही…कार्यकारी अभियंता, रा.म. वी. अकोला…

आकोट – संजय आठवले

अकोला आकोट मार्गावरील गांधीग्राम येथील पूर्णा नदीवर पूल क्षतिग्रस्त झाल्याने, यावरून कोणतेही वाहन नेण्यास प्रतिबंधक करण्यात आलेला आहे. यादरम्यान ह्या रस्त्याची सखोल तपासणी करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभाग अकोला यांचे मार्फत करण्यात येत होते. दिनांक १८ ऑक्टोबर २०२२ पासून हि तपासणी सुरू होती. या तपासणी अंती या विभागाचे तज्ज्ञांनी ह्या पुलावरून एका वेळेस २ ते ४ दुचाकी वाहने ढकलत नेण्यास सद्यस्थितीत सहमती दर्शविली आहे.

या संदर्भात या विभागांने आपली अशी सहमती असल्याचे जिल्हाधिकारी अकोला, जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला, अधीक्षक अभियंता राष्ट्रीय महामार्ग मंडळ नागपूर, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोला, पोलीस निरीक्षक दहीहंडा यांना पत्रांन्वये कळविले आहे. त्यामुळे तूर्तास या पुलावरून एका वेळेस २ ते ४ दुचाकी वाहने ढकलत नेता येणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: