नांदेड – महेंद्र गायकवाड
धर्माबाद -बनाळी चौक येथे काल रात्री एक चारचाकी वाहन व एक हायवाचा अपघात झाला असून या हायवा गाडीत मुरूम असल्याचे बोलल्या जात आहे.या अपघाताबदल शहरात मोठया प्रमाणात चर्चा होत असून पोलिसांच्या कारवाईबदल शंका व्यक्त केली जात आहे. या अपघाताची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यातून होत आहे.
धर्माबाद तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात परवानगी नसतानाही मुरूम उत्खंनन चालू असल्याचे दिसून येत आहे. तालुकास्तरातील तहसील महसुल प्रशासन व पोलीस प्रशासन याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहे.
काल एका मुरूम घेऊन जाणाऱ्या हायवा गाडीने एका चारचाकी वाहनास जबर धडक देऊन चारचाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नसली तरी चालकास मार लागल्याने त्यास उपचारासाठी नांदेडकडे पाठविले असल्याचे वृत्त आहे.
धर्माबाद शहरात व तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लॉटिंगचे कामे चालू आहेत. त्या प्लॉटिंगवर बिनधास्त आणि सर्रासपणे अवैधरित्या हायवा, ट्रक, टेम्पो ही वाहने विनापरवाना मुरुम आणि रेतीचे उत्खनन करून पुरवठा करीत आहेत.
नुकतेच बनाळी चौक धर्माबाद याठिकाणी बेधडक भरधाव पणे विनापरवाना मुरूम उत्खनन करणाऱ्या एका हायवाने चारचाकी वाहनास धडक देऊन त्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात एकावयास मिळत आहे. अपघात केलेले वाहन आय. टी. आय. परिसरात असल्याचे बोलले जात आहे.
हे प्रकरण परस्पर मिटविण्याच्या प्रकार तर नाहीना असा प्रश्न निर्माण होत असून या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यातुन होत आहे.पोलीस या अपघात प्रकरणी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या हायवातील मुरूम इतरत्र हलवून या हायवातअवैध मुरूम नसल्याचे भासविण्याचा व दिशाभूल करण्याचा प्रकार घडू नये व या हायवाच्या चालकावर व मालकावर पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन काय कारवाई करेल .? हे मात्र गुलदस्त्यात आहे.