दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या चौकशीत आलेले उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सोमवारी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की भारतीय जनता पक्षाने (BJP) त्यांना आम आदमी पार्टी (Aap) मधून बाहेर पडण्यास सांगितले आहे आणि त्याऐवजी सीबीआय-ईडी केस बंद करण्याचे आमिष दाखवले आहे. स्वत:ला राजपूत आणि महाराणा प्रताप यांचे वंशज असल्याचे सांगून सिसोदिया म्हणाले की, शिरच्छेद झाला तरी चालेल, पण झुकणार नाही.
सिसोदिया यांनी ट्विट केले की, “मला भाजपचा संदेश मिळाला आहे – ‘आप’ सोडा आणि भाजपमध्ये सामील व्हा, सीबीआय ईडीची सर्व प्रकरणे बंद केली जातील. भाजपला माझे उत्तर- मी महाराणा प्रताप यांचा वंशज आहे, मी राजपूत आहे. सर कटा लूंगा लेकिन भ्रष्टाचारियो-षड्यंत्रकारियों के सामने झुकूंगा नहीं…माझ्यावरील सर्व खटले खोटे आहेत. जे करायचं ते करा.”
दरम्यान, सिसोदिया हे अरविंद केजरीवाल यांच्यासोबत गुजरातला रवाना झाले आहेत. ते म्हणाले, “”मी अरविंद केजरीवाल यांच्यासोबत दोन दिवसांच्या दौऱ्यावर गुजरातला जात आहे. दिल्लीत ज्या पद्धतीने काम सुरू आहे आणि पंजाबमध्ये ज्या पद्धतीने काम सुरू आहे, ते पाहून प्रभावित होऊन गुजरातमधील जनता केजरीवाल यांना संधी देऊ इच्छित आहे. भाजपने गेल्या 27 वर्षात गुजरातसाठी जे केले नाही ते केजरीवाल यांचे सरकार दाखवून देईल असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले.