Sunday, December 22, 2024
Homeराज्यकवठेपिरान मधील चोरीचा छडा, फिर्यादीचा पुतण्या अटक, दोन लाख २५ हजारांचा मुद्देमाल...

कवठेपिरान मधील चोरीचा छडा, फिर्यादीचा पुतण्या अटक, दोन लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त…

सांगली – ज्योती मोरे.

ज्योती राजेंद्र कवठेकर. वय वर्षे- 42, मुळगाव- कवठेपिरान, सध्या राहणार- चिपळूण. या दिवाळीसाठी कवठेपिरानला आपल्या कुटुंबासह मूळ गावी आले असताना कामात व्यस्त असताना अज्ञात इसमानं घरात प्रवेश करून 2 लाख 25 हजारांचे दागिने चोरण्याचा प्रकार घडला होता.त्या अनुषंगाने तपास सुरू असताना खास बातमीदारांने दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचा पुतण्या असणाऱ्या अश्वजीत जितेंद्र कवठेकर. वय वर्षे -, राहणार-अभय नगर, लक्ष्मी मंदिराजवळ हडको कॉलनी, सांगली. यास ताब्यात घेतले असता,त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

त्याच्या जवळून चोरीतील 75 हजार रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस,1 लाख रुपये किमतीच्या बांगड्या, 50हजारांची सोन्याची चेन असा एकूण 2 लाख 25 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष माने हे करत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली,उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष माने, मेघराज रुपनर, पोलीस नाईक सुशील मस्के आदींनी केली.

Jyoti More
Jyoti Morehttp://mahavoicenews.com
मी ज्योती प्रभाकर मोरे, राहणार सांगली, मी गेल्या सहा वर्षांपासून बातम्यांची विश्वसनीयता जपणाऱ्या महा व्हॉइस या पोर्टलसाठी सांगली प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. शिवाय सांगलीमध्ये अनेक शॉर्ट फिल्म मध्ये अभिनय केला असून, केक या शॉर्ट फिल्म साठी बेस्ट ऍक्टरचे पारितोषिक प्राप्त केले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: