६९००/ रुपयांच्या मुद्देमालावर हात साफ…
रामटेक – राजु कापसे
रामटेक – पोलीस स्टेशन रामटेक येथुन अवघ्या दोन अडीच किमी अंतरावर असलेल्या शितलवाडी येथील महाकाल डेअरी ॲन्ड बेकरी येथे काल दि. १८ रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरी करून ६९०० रुपयांच्या मुद्देमालावर हात साफ केला.
पोलीस स्टेशन रामटेक येथुन मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी पंकज सुर्यभान बालपांडे वय 44 वर्ष रा. शितलवाडी हे नेहमी प्रमाणे त्यांची महाकाल डेअरी & बेकरी दुकान बंद करुन घरी निघुन गेले.
दुसऱ्या दिवशी दि. १९ डिसेंबर ला सकाळी ८ वा नेहमी प्रमाणे बालपांडे हे त्यांच्या दुकानात गेले असता फिर्यादीला त्याच्या दुकानाचे शटर तुटलेल्या अवस्थेत दिसले. त्यामुळे त्यांनी दुकानाच्या आत मध्ये जावुन पाहणी केली असता त्यांच्या दुकानाच्या गल्ल्यातुन ३५००/- रुपये रोकड व ३४००/- रु. चे सिगरेट पँकेट असे एकुण ६९००/- रु. चा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने रात्री दरम्यान चोरी केली.
फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरुन पोलीस ठाणे रामटेक येथे अपराध क्र. ९८७/ २०२४ कलम ३०५(A) , ३३१(४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा करुन तपासात घेतला. घटनास्थळावरुन मिळालेल्या सि.सि.टि.व्हि. फुटेज च्या आधारे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे येथील गुन्हे प्रगटीकरण पथक करीत आहे.