Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीसिद्धनेर्ली नदी किनारा येथील कापड दुकानात चोरी...

सिद्धनेर्ली नदी किनारा येथील कापड दुकानात चोरी…

कागल – राहुल मेस्त्री

सिद्धनेर्ली ता.कागल येथील नदी किनारा म्हणून परिचित असलेल्या रहदारीच्या ठिकाणी एका कापड दुकानांमध्ये काही अज्ञात चोरट्याकडून चोरी झाल्याची घटना दि.11 रोजी उघडकीस आली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ओकांर सुंदर हिंदुळे रा.दऱ्याचे वडगांव ता.करवीर यांचे सिद्धनेर्ली येथील नदी किनारा येथे ओम ट्रेड वेअर नावाचे कापड दुकान असून या कापड दुकानाचे काही अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून सुमारे 60 हजार रुपये इतक्या किमतीचे कपडे चोरून घेऊन गेल्याची घटना दि.11 रोजी उघडकीस आली.

या झालेल्या घटनेनंतर ओंकार हिंदोळे यांनी कागल पोलीस ठाणे या ठिकाणी जाऊन घडल्या प्रकाराची माहिती देऊन त्या अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यांच्या या दिलेल्या फिर्यादीनुसार कागल पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 380,457 प्रमाणे गुन्हा दाखल करून घेतला आहे.पुढील तपास पोलीस नाईक विनायक औताडे हे करत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: