Monday, December 30, 2024
Homeगुन्हेगारीपातूर | 'त्या' अपघातात युवकाची ओळख पटली, युवकावर शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार...

पातूर | ‘त्या’ अपघातात युवकाची ओळख पटली, युवकावर शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार…

पातूर – निशांत गवई

पातूर – बाळापूर मार्गावर असलेल्या संभाजी चौकात एका ट्रकने पायदळ चालत असलेल्या युवकास जोरदार धडक दिली. त्याचा घटनास्थळावर मृत्यू झाला होता. अज्ञात युवकांचे ओळख पटविण्याचे आवाहन पातूर पोलिसांनी केले होते. सदरचा युवकाचे नाव गणेश रामदास नांदे असून, तो बार्शीटाकळी तालुक्यातील सायखेड येथील रहिवासी असल्याचे प्रकाशीत वृत्तामुळे समोर आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अपघाता पूर्वी सदर युवक हा शहरातील चौकात फिरताना दिसून आला असून हा वेडसर असलेल्या अवस्थेत फिरताना दिसला. हा अपघात एवढा भीषण होता कि, या युवकाचा मेंदू बाहेर पडून छिन्नविछीन्न होऊन रस्त्यावर पडला. मृतक युवकाचे उजव्या हातावर गणेश व रिंकू असे गोंदलेले असून कुणाच्या परिचित असेल त्यांनी पातूर पोलीस स्टेशनला माहिती देण्याचे आवाहन पातूर पोलिसांनी केले होते.

सदर घटनेचे वृत्तपत्रा मध्ये सविस्तर प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामध्ये ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले होते. मृतक व्यक्तीच्या नातेवाईकांनी वृत्तपत्रा मध्ये प्रकाशीत वृत्ताचा आधारे पातूर पोलिस स्टेशनमध्ये संपर्क केला. कायदेशीर कारवाई पुर्ण करून मृतदेह ताब्यात घेतला व शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास ठाणेदार किशोर शेळके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मिरा सोनवणे मॅडम त्यांचे रायटर राठोड मेजर करीत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: