Sunday, December 22, 2024
Homeराज्यगडचिरोली | सिरोंचा तालुक्यातील युवकांनी केला माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या...

गडचिरोली | सिरोंचा तालुक्यातील युवकांनी केला माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश…

गडचिरोली – सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा, नगरम, तुमनूर, बोगापूर, अमराजी, आयपेठा, तुरायपल्ली, नारायणपूर, मेळाराम, रामनजेप्पूर, कारसपल्ली, रंगाय्यापल्ली इत्यादी गावातील शेकडो युवकांनी भाजपात प्रवेश केला आहे.

युवकांनी अहेरी येथील रुक्मिणी महल येथे राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांची भेट घेतली आणि राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला.

अंम्ब्रिशराव आत्राम यांनी सिरोंचा येथील युवा कार्यकर्ते यांची तालुक्यातील असलेले प्रश्न,अडचणी आणि स्थानिक समस्या विषयी त्यांच्या सोबत चर्चा केली आणि आपण सदैव सिरोंचा तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी तत्पर आहो असे आश्वासन दिलं.

त्यांना सामाजिक कार्यासाठी सदैव धडपडत राहा आणि कार्य करत रहा मी आपल्या सोबत सदैव आहो असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले, ह्यावेळी सिरोंचा आणि अहेरी येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: