Sunday, December 22, 2024
HomeSocial Trendingमूर्तिजापूर या तरुणांनी तर कमालच केली...विक्रम वेधाचे ट्रेलर त्यांच्या शैलीत बनविले...शूटिंगचा दर्जा...

मूर्तिजापूर या तरुणांनी तर कमालच केली…विक्रम वेधाचे ट्रेलर त्यांच्या शैलीत बनविले…शूटिंगचा दर्जा बघा…

न्युज डेस्क – जेव्हा पासून सोशल मीडिया आला तेव्हा पासून आपल्यातील लपलेल्या गुणांना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक मार्ग मिळाला, सोशल मीडियाचा वापर लोक वेगवेगळ्या कामासाठी तर कोणी मनोरंजन करण्यासाठी करतात. मूर्तिजापूर येथील तरुणांनी तर थेट विक्रम वेधा चा हुबेहूब ट्रेलर बनवून सोशल मीडियावर धमाल उडवून दिली. मुर्तिजापूर सारख्या लहानशा शहरात एवढ्या चांगल्या दर्जाचे चित्रीकरण करून दाखवून दिल्याने या मुलांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मूर्तिजापूर येथील या तरुणांनी शोमन स्टुडिओ नावाने youtube channel सुरू केले आहे, ओम खंडबळकर, अनुप चांदणे आणि चैतन्य या तिघांचा यात सहभाग असून त्यांनी आता विक्रम वेधा चा ट्रेलर आपल्या शहरात बनविला असून हा ट्रेलर बघून विश्वास बसणार नाही, यातील फायटिंग सिंग बघून तर बॉलिवूडमध्ये शूट केले की काय असं भास होतो.

याआधी ही त्यांनी शोमन पुष्पा चित्रपटाचा एक सीन तयार केला होता तोही तेवढाच दर्जेदार बनवलेला होता, दक्षिणेतील अभिनेते विजय सेतुपती आणि आर माधवन यांनी ‘विक्रम वेधा’ या तमिळ चित्रपटात काम केले आहे. विक्रम वेधा चित्रपट चा रिमेक हृतिक रोषण आणि सैफ अली खान ने केला आहे. जो 30 सितंबर 2022 मधे रिलीज झाला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: