Monday, December 23, 2024
Homeराज्य१४ मार्च पासून जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प होणार...

१४ मार्च पासून जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प होणार…

कास्ट्राईबसह सर्व कर्मचारी संघटना सहभागी होणार…

नागपूर – शरद नागदेवे

राज्य कर्मचारी संघटना व इतर कर्मचारी संघटनांनी जुनी पेन्शन योजना लागू करणे व इतर सेवा विषयक मागण्यासाठी १४ मार्च पासून बेमुदत संप पुकारला असून या संपात कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेसह जिल्हा परिषदेच्या सर्व संघटना सहभागी होणार असल्याची माहिती कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे यांनी दिली.

या संपामुळे जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प पडणार आहे. राज्य शासनाकडे ज्या मागण्या करण्यात आल्या त्यामध्ये सन २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, बक्षी समितीचा खंड २ शिफारस अहवाल फेटाळून नव्याने समिती गठित करणे, सर्व रिक्त पदे भरणे, मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देणे, सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६० करणे, केंद्रा प्रमाणे भत्ते लागू करणे, विना अट अनुकंपाची पदे भरणे,

आदी मागण्यांचा समावेश आहे.

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेची जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील संघटनेच्या कार्यालयात नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीत १४ मार्च पासून होणाऱ्या बेमुदत संपात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ सोहन चवरे, सचिव नरेंद्र धनविजय, परशुराम गोंडाणे, भिमराव सालवनकर, प्रबोध धोंगडे, धनराज राऊळकर, निरंजन पाटील, नरेंद्र मेश्राम आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: