सांगली – ज्योती मोरे
अयोध्येतील सुरू असलेल्या भव्य राम मंदिराचे काम 2024 च्या जानेवारीत पूर्ण होणार असल्याची माहिती अयोध्येतील राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज यांनी सांगलीत व्यक्त केले. ते सांगलीत सुरू असलेल्या श्री रामकथा व नाम संकीर्तन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आले होते, तेव्हा ते बोलत होते.
हजारो सांगलीकरांनी या कीर्तन सोहळ्यास हजेरी लावली होती.येथील नेमिनाथ नगर मधील कल्पद्रुम क्रीडांगणावर सुरू असलेल्या श्रीराम कथा व संकीर्तन सोहळ्यात राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
सोहळा सुरू असलेल्या अयोध्या नगरीत श्री राम कथा व संकीर्तन समिती सांगली यांच्या मार्फत दि.७ जानेवारी ते दि.१४ तारखे पर्यंत आयोजित श्रीराम कथा, प्रवचन, किर्तन कार्यक्रम, महाप्रसाद आदि विविध धार्मिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहेतं. शनिवारी राम कथेचा तिसरा दिवस होता. या मध्ये पंडित परम पूज्यजी श्री समाधान शर्मा यांनी राम जन्मोत्सवाचे रसभरीत वर्णन केलें. यावेळी भाविकांनी श्रीरामाचा जयजयकार करत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
शनिवारी श्री राम कथेस प्रारंभ करण्यापूर्वी मनोहर सारडा आणि परिवार, पंडितराव पाटील, विजयराव गवळी,कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज यांच्या हस्ते परम पूज्य श्री समाधान महाराज शर्मा यांना पुष्पमाला अर्पण करण्यात आली. येथे दररोज सात ते आठ हजार भक्तांची उपस्थितीत कथा, हरिपाठ , किर्तन पार पडत आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत येथे कार्यक्रम सुरु असून, यात आरोग्य शिबिर, पारायण, हरिपाठ, असा नित्य दिनक्रम सुरू आहे.
शनिवारी हरिभक्त परायण श्री गुरु कृष्ण महाराज चौरे यांचे नाम संकिर्तन झाले. तसेच श्रीराम जन्मभूमी या विषयावर मार्गदर्शन केले.महाराजांनी भक्त गणांना आपल्या वाणीने भक्तीरसात तल्लीन व्हायला भाग पाडलं, आयोध्या नगरीत हजारो भक्त यांचे निरूपण ऐकण्यासाठी उपस्थित होते.